`जयरामभाई`च्या माजी विद्यार्थ्यांनी सोडला शाळा रंगरंगोटीचा संकल्प 

live
live

कामास सुरवात; 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा पुढाकार, कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न 
नाशिक ः गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्री जयरामभाई हायस्कूलमध्ये 1983 ते 2009 यादरम्यान शिकलेले माजी विद्यार्थी एकत्र येत शाळेप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या वर्गखोल्यांना नवे रूप देत अनोखी गुरुदक्षिणा देणार आहेत.

अनंत चतुर्दशीला श्री जयराम हायस्कूलच्या वर्गखोल्यांच्या नूतनीकरणाचा प्रारंभ झाला. ज्या शाळेने घडविले, मोठे केले. त्या शाळेप्रति कृतज्ञता म्हणून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. 

श्री जयरामभाई हायस्कूलचे अनेक विद्यार्थी दूरदूर पसरले आहेत. अनेक जण विदेशात आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेप्रति कृतज्ञता म्हणून वर्गखोल्यांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला. शाळेसाठी काहीतरी उत्कृष्ट करण्याचा ध्यास घेत माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन माजी विद्यार्थ्यांपैकी विदेशात कार्यरत असलेले तेजस तुपे यांच्यासह विविध बॅचमधील विद्यार्थी एकत्र आले.

   श्री जयरामभाई हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या वर्गखोल्यांना नवे रूप देण्याच्या उपक्रमाचा संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या बॅचमधील आशिष कुलकर्णी, किशोर कटारे, चेतन सोनवणे, तेजस तुपे यांची समन्वय समिती नेमली आहे. मुख्याध्यापक जयंत खैरनार, डॉ. राम कुलकर्णी, संस्थेचे प्रकल्प संचालक शैलेश गोसावी, माजी शिक्षक यशवंत भाबड, एस. आर. सुकेणकर, पुष्पा गवांदे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीप खटोड, शिक्षक यू. व्ही. देशपांडे, के. यू. चव्हाण, डी. के. पवार यांच्या सहकार्याने कामकाज करते. 

वर्गखोलीचा श्रीगणेशा 
श्री जयरामभाई हायस्कूलमधील विविध वर्षातील शिकणाऱ्या अतुल धोंगडे, प्रवीण कुटे, अमोल भामरे, उमेश जाचक, पोपट कोठुळे, चेतन सोनवणे, प्रफुल्ल आव्हाड, विशाल घोलप, मंगेश चव्हाण, अमोल भांबरे, शेळके बंधू, कीर्ती तायडे, प्रसन्न बिडवई, मेघा जाधव, उमेश साळवी, अनिकेत देशपांडे, सुनील थोरात, तुषार खांडबहाले आदींसह पन्नासवर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनंत चतुर्दशीला शाळेतील पहिल्या वर्गखोलीच्या नूतनीकरणाच्या कामापासून सुरवात केली. वर्गाचा चेहरामोहरा बदलण्याचा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला. 

आमच्या जडणघडणीत शाळेचा मोठा वाटा आहे. शाळा सर्वांच्या मनात रुजली आहे. ही जन्मभूमी, जननी शाळेसाठी काही करण्याची आमची इच्छा आहे. तिचे आंतरबाह्य रूप बदलण्याचा आमचा निर्णय झाला असून, त्यासाठी आम्ही एकत्र आलो. 1983 ते 2009 पर्यंतच्या वेगवेगळ्या वर्षातील विद्यार्थी यात सहभागी होऊन हे काम करणार आहोत. 
-तेजस तुपे (माजी विद्यार्थी, श्री जयरामभाई हायस्कूल) 

ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे समाजऋण फेडण्याचा माजी विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. जीवनात नीतीमूल्यांची जोपासना, विद्या व जीवनमूल्ये जोपासल्याने त्यांना ही प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांनी शाळेप्रति आदर व श्रद्धा प्रत्यक्ष कृतीतून दाखविली आहे. भाषणापेक्षा कृती महत्त्वाची आहे. 
- डॉ. मो. स. गोसावी, सचिव, गोखले एज्युकेशन संस्था 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com