एक हजार घरांमध्ये आढळल्या "डेंग्यू'च्या अळ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव ः शहरात दिवसेंदिवस "डेंग्यू'च्या रुग्णांची संख्या वाढत असून, दवाखाने रुग्णांनी फुल्ल भरलेले आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे शहरात अबेटिंग व धूरफवारणीचे काम सुरू आहे. अबेटिंग दरम्यान महापालिकेच्या पथकाने तपासणी केली असता 1 हजार 70 घरांमध्ये साठवलेल्या पाण्यात "डेंग्यू'च्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

जळगाव ः शहरात दिवसेंदिवस "डेंग्यू'च्या रुग्णांची संख्या वाढत असून, दवाखाने रुग्णांनी फुल्ल भरलेले आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे शहरात अबेटिंग व धूरफवारणीचे काम सुरू आहे. अबेटिंग दरम्यान महापालिकेच्या पथकाने तपासणी केली असता 1 हजार 70 घरांमध्ये साठवलेल्या पाण्यात "डेंग्यू'च्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 
शहरात अस्वच्छतेमुळे साथरोगांच्या आजारात वाढ झाली आहे. त्यातच स्वच्छ पाण्यात होणारे "डेंग्यू'च्या अळ्यांमुळे "डेंग्यू'च्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. यातच गेल्या तीन महिन्यांत शहरात डेंग्यूचे 22 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होते. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेत बैठक येऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी विविध विभागातील 80 कर्मचाऱ्यांना तातडीने तात्पुरत्या स्वरूपात मलेरिया विभागात नियुक्ती करून शहरात अबेटिंग, धूरफवारणी अशा उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील विविध भागांत औषध फवारणी, अबेटिंग व धूरफवारणीचे काम सुरू आहे. 

चार दिवसांत 22 हजार घरांची तपासणी 
मलेरिया विभागातर्फे शहरात 24 ऑगस्टपासून शहरातील विविध भागांमध्ये उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. त्यात अबेटिंग करताना कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या घरातील साठवलेले पाणी तपासले जात आहे. आतापर्यंत मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील 22 हजार 674 घरांची तपासणी केली असून, यात 1 हजार 70 घरांमधील भांड्यामध्ये "डेंग्यू'च्या अळ्या आढळल्या आहेत. तर 12 हजार साठवलेल्या पाण्यात अबेटिंग, 346 पाणीसाठे रिकामे केले आहे. 

तपासणीसाठी "अर्जंट कॉल व्हॅन' 
मलेरिया विभागामार्फत शहरातील धूर व औषध फवारणीसाठी 20 कर्मचाऱ्यांची 4 पथक तयार केली आहेत. तसेच त्यांच्यासोबत जुन्या 25 कर्मचाऱ्यांचे पथक असून, ज्या घरात "डेंग्यू'सदृश अळ्या आढळल्या त्या ठिकाणी तपासणी व उपाययोजना "अर्जंट कॉल व्हॅन' तयार केली आहे. 

उच्चभ्रू वस्तीत "डेंग्यू'चे प्रमाण अधिक 
डेंग्यू डासाच्या अळ्या या जास्त दिवस साचलेल्या स्वच्छ पाण्यात होतात. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीमध्ये साठविलेल्या पाण्यात "डेंग्यू'च्या अळ्या अधिक असल्याचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तपासणी व अबेटिंग दरम्यान आढळून आले आहे. 

शहरात साथरोगांबाबत उपाययोजना सुरू आहे. घरोघरी जाऊन अबेटिंग करताना "डेंग्यू'च्या अळ्या आढळल्या 
आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत असून, औषध फवारणी, धूरफवारणीचेही काम सुरू आहे. 
- एस. व्ही. पांडे, मलेरिया विभागप्रमुख, महापालिका. 

Web Title: marathi news jalgaon 1 thausond haous dengu