शंभर कोटींच्या कामाचा दहा दिवसांत "डीपीआर' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जळगाव ः महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 100 कोटींचा निधी महापालिकेला मंजूर झाला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामांचे दहा दिवसांत विकास आराखडा (डीपीआर) तयार केला जाणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. 

शहरात अमृत योजनेचे काम सुरू असून, पूर्ण करण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यात अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटारी व मलनिसारणचे देखील काम होणार आहे. शहरात अमृत योजनेंतर्गत पाइप टाकण्याचे काम सुरू असून, भूमिगत गटारीसाठी पुन्हा रस्ते खोदले जातील. त्यामुळे निविदा मंजूर करण्यापूर्वीच ही दोन्ही कामे एकत्र सुरू करता येईल, का याबाबत आज आयुक्तांकडे 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व जैन कंपनीचे अधिकारी यांच्यासह महापालिकेच्या बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांची बैठक झाली. 

मंजूर अनावश्‍यक कामांचा शोध 
मुख्यमंत्र्यांनी दिलेले 100 कोटी रुपयांचा निधी हा नवीन रस्ते तयार करण्यासाठी असून, त्यातून रस्ते दुरुस्ती करता येणार नसल्याचे समजते. तसेच मागील 25 कोटींच्या निधीतून घेतलेले कामे पुढील विकास कामामध्ये होणार आहे. त्यामुळे अशा अनावश्‍यक कामांचा शोध घेऊन तो निधी दुसरीकडील कामांसाठी वापरण्याबाबत शोध सुरू असल्याचे समजते. 

Web Title: marathi news jalgaon 100 carore 10 days DPR