जळगाव जिल्ह्यात 114 नोंदणीकृत सावकार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 March 2020

जळगाव : जिल्ह्यात एकशेचौदा नोंदणीकृत सावकार आहेत. त्यांनी गतवर्षी 2 कोटी 12 लाखांचे कर्जवाटप केले आहे. मात्र, हे सर्व बिगरकृषी कर्ज असल्याची नोंद आहे. 

जळगाव : जिल्ह्यात एकशेचौदा नोंदणीकृत सावकार आहेत. त्यांनी गतवर्षी 2 कोटी 12 लाखांचे कर्जवाटप केले आहे. मात्र, हे सर्व बिगरकृषी कर्ज असल्याची नोंद आहे. 

शेतकऱ्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या माफीनंतर आता सावकारी कर्जही माफ करण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. यात केवळ विदर्भ व मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांचेच सावकारी कर्ज माफ करण्यात येणार आहे. यात खानदेश, तसेच इतर भागातील सावकारी कर्ज नसल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भ व मराठवाड्यात थेट सावकारी जमीन तारण ठेवून पीककर्ज देतात. त्यामुळे त्यांची नोंद असते. खानदेशात सावकारामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारे कर्ज देण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. खानदेशात सावकारी कर्ज हे सोने तारण ठेवून देण्यात येते. 
सावकारी कर्ज देणाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे अधिकृत नोंद करावी लागते. जळगाव जिल्ह्यात सद्यःस्थितीत एकूण 114 नोंदणीकृत सावकार आहेत. गेल्या वर्षी 101 होते. त्यात यावर्षी चौदा सावकारांनी नव्याने नोंदणी केली आहे. जळगाव तालुक्‍यात सर्वांत जास्त 42 सावकार आहेत. तर जिल्ह्यात तालुकानिहाय नोंदणीकृत सावकारांची संख्या अशी : भुसावळ : 19, जामनेर : 27, बोदवड : 2, चाळीसगाव : 21, अमळनेर : 2, एरंडोल : 1, धरणगाव : 2, पाचोरा : 4, मुक्ताईनगर : 7, चोपडा : 1, रावेर : 1 

 
बिगरकृषी कर्ज दोन कोटी 
जिल्ह्यात नोंदणीकृत खासगी सावकाराकडून बिगरकृषी कर्ज वाटप केल्याची नोंद आहे. गतवर्षी 2 हजार 385 जणांना बिगरकृषी कर्जाचे 2 कोटी 12 लाख रुपयांचे कर्जवाटप केले असल्याची शासनाकडे नोंद आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 114 registered lenders in Jalgaon district