जिल्ह्यात बारा तासात सहा पॉझिटीव्ह; एकूण 43 रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 मे 2020

एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यानंतर संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात अमळनेर हॉटस्पॉट ठरला असून, त्या पाठोपाठ आता भुसावळ देखील हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे.

जळगाव ः कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यात कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून दोन्ही व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. गेल्या बारा तासात जिल्ह्यात सहा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 

नक्‍की पहा - जिल्ह्यात आतापर्यंत बारा जणांचा कोरोनाने मृत्यू 

जळगाव जिल्हा कोरोना व्हायरसचा रेडझोन झाला आहे. जळगावात पहिला रूग्ण आढळल्यानंतर खळबड उडाली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून न आल्याने जिल्हा सेफ मानला जात होता. मात्र अमळनेर तालुक्‍यातील मुंगसे येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यानंतर संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात अमळनेर हॉटस्पॉट ठरला असून, त्या पाठोपाठ आता भुसावळ देखील हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. कारण आज प्राप्त दोन्ही पॉझिटीव्ह अहवाल असलेले रूग्ण भुसावळ येथील आहेत. 

सकाळी दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह 
कोरोना व्हायरसचा जिल्ह्यातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यात आणखी दोन रूग्णांची भर पडली. आज सकाळी दोन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून दोन्ही अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. हे दोन्ही व्यक्ती भुसावळचे असून यात 42 वर्षीय पुरूष व 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोन पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 12 hour six positive report corona virus