जिल्ह्यात आतापर्यंत बारा जणांचा कोरोनाने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

राज्याच्या तुलनेत जळगावात अधिक म्हणजे 40 टक्‍के इतका आहे. आजच्या दोन जणांच्या मृत झालेल्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित मृत झालेल्यांची संख्या बारा झाली आहे. 

जळगाव ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना जळगाव जिल्ह्यात देखील याचा कहर सुरूच आहे. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची मृत होण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत जळगावात अधिक म्हणजे 40 टक्‍के इतका आहे. आजच्या दोन जणांच्या मृत झालेल्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित मृत झालेल्यांची संख्या बारा झाली आहे. 

नक्‍की पहा - नंदुरबारच्या एका पोलिसाला कोरोनाची लागण 
 

कोरोना हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोना वॉर्डात दाखल रूग्णांपैकी एक जण चांगला होवून घरी परतला आहे. तर यातील बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आकडा समोर येत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांना कोरोना वॉर्डात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले असून, गेल्या आठवडाभरापासून संशयीत आणि पॉझिटीव्ह रूग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. आगामी काही दिवसात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्‍यता देखील वर्तविली जात आहे. 

अडावद, पाचोरा येथील रूग्णांचा मृत्यू 
कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला. यामध्ये अडावद (ता. चोपडा) येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील दाखल 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. या दोन जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two death corona positive case