बारावी सीबीएसई परिक्षेत क्षितीज जगताप जिल्ह्यात प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

जळगाव ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहिर झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातून रूस्तमजी इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी क्षितीज प्रसाद जगताप हा 96.02 टक्‍के मिळवून प्रथम आला. 

बारावी सीबीएसई परिक्षेचा निकाल दुपारी साडेबाराला ऑनलाईन जाहिर झाला. मात्र, अनेकजण निकाल पाहत असल्याने वेबसाईट हॅंग झाली होती. यामुळे निकाल पाहण्यास अडचणी येत होत्या. एक ते दीड तासानंतर निकाल दिसू लागला होता. जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रीय विद्यालय, सेंट जोसेफ, रूस्तमजी इंटरनॅशनल, ओरियन सीबीएसई स्कुल, गोदावरी सीबीएसई स्कुल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यामध्ये रूस्तमजी इंटरनॅशनल स्कुलचा क्षितीज जगतापने जिल्ह्यातून सर्वात जास्त 96.02 टक्‍के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर सेंट जोसेफ स्कुलमधून मिलोनी दिपक अटलने 95.04 गुण प्राप्त केले. 

Web Title: marathi news jalgaon 12th cbse result