जिल्ह्यात 353 मतदान केंद्रांचे होणार "वेबकास्टिंग'! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

जळगाव ः निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या 10 टक्‍के केंद्रांचे "वेबकास्टिंग' दिवसभर करण्यात येणार आहे. 

जळगाव ः निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या 10 टक्‍के केंद्रांचे "वेबकास्टिंग' दिवसभर करण्यात येणार आहे. 
जिल्ह्यात तीन हजार 532 मतदान केंद्रे आहेत. पैकी दहा टक्के म्हणजे 353 मतदान केंद्रांत "वेबकास्टिंग' होईल. यात सखी महिला मतदार केंद्र, आदर्श मतदान केंद्रे, संवेदनशील, अतिसंवेदनशील केंद्रांचा समावेश आहे. अशा मतदान केंद्रांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच ती यादीही जाहीर होईल. मतदान सुरू होण्यापासून संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रण होणार आहे. सोबतच त्या मतदान केंद्रांतील सोयी-सुविधांचे "वेबकास्टिंग' होईल. यामुळे मतदार या मतदान केंद्रांत अधिकाधिक संख्येने येतील, असे नियोजन आहे. या केंद्रांत दिवसभर चित्रीकरणही होईल. अशा प्रकारे "वेबकास्टिंग' पहिल्यांदाच होणार असल्याने मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 
 
"रॅम्प'ची व्यवस्था 
सर्वच मतदान केंद्रांत अपंग, दिव्यांग मतदारांसाठी "रॅम्प'ची व्यवस्था करण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. आज जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, रावेर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन सोयी-सुविधांची पाहणी केली. 

आकडे बोलतात... 
मतदारसंख्या ः 34 लाख 5 हजार 258 
मतदान केंद्रे ः 3 हजार 532 
पुरुष मतदार ः 17 लाख 79 हजार 27 
महिला मतदार ः 16 लाख 26 हजार 156 
व्हीव्हीपॅट मशिन ः 4 हजार 354 

Web Title: marathi news jalgaon 353 election center webcasting