शहरातील 38 गाळेधारकांनी भरले 2 कोटी 66 लाख 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

जळगाव : मुदत संपलेल्या गाळेधारकांना महापालिका प्रशासनाकडून कलम 81 "क'ची नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीची मुदत संपुष्टात येत असल्याने तसेच प्रशासनाकडून गाळेजप्तीची कारवाई टाळण्यासाठी शहरातील 38 गाळेधारकांकडून 2 कोटी 66 लाख रुपयांचे धनादेश आयुक्त डॉ. टेकाळे यांच्याकडे जमा करण्यात आले. 

मुदत संपलेल्या गाळेधारकांचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने हे गाळे ताब्यात घेण्याचे दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. आता मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कलम 81 "क'ची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत संपल्यानंतर गाळेधारकांवर कोणत्याही क्षणी जप्तीची कार्यवाही होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गाळेधारकांकडून थकीत असलेल्या भाड्याची रक्कम जमा करण्यास सुरवात झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांत अनेक गाळेधारकांनी थकीत असलेल्या भाड्याच्या रकमेचा धनादेश महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला होता. आज शहरातील 38 गाळेधारकांनी 2 कोटी 66 लाख रुपयांचे धनादेश आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे सुपूर्द केले असून, गाळेधारकांकडून थकीत रक्कम भरण्यासाठी सरसावले असल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 38 gade dharak bharna 2 carrore