चौपदरीकरणास आता आचारसंहितेनंतरचा मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

जळगाव : समांतर रस्त्यांसाठी आंदोलन झाल्यानंतर मंजुरी मिळालेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाची निविदा प्रक्रिया मार्गी लागली असली तरी आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच या कामास मुहूर्त लागणार आहे. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामासाठी प्राप्त निविदांचा "खेळ' अजून सुरूच असून आता या निविदा गुरुवारी (ता. 14) उघडण्यात येतील. 

जळगाव : समांतर रस्त्यांसाठी आंदोलन झाल्यानंतर मंजुरी मिळालेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाची निविदा प्रक्रिया मार्गी लागली असली तरी आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच या कामास मुहूर्त लागणार आहे. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामासाठी प्राप्त निविदांचा "खेळ' अजून सुरूच असून आता या निविदा गुरुवारी (ता. 14) उघडण्यात येतील. 

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील प्रचंड वाढलेल्या वाहतुकीमुळे होणारे अपघात व त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता समांतर रस्त्यांच्या मागणीने गेल्या दोन वर्षांत जोर धरला, त्यासाठी आंदोलनेही झाली. अखेरीस महामार्ग चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांचे काम मंजूर होऊन त्यासाठी 140 कोटींचा डीपीआरही मंजूर झाला. 

निविदा प्रक्रियेचा खेळ 
पहिल्या टप्प्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम निश्‍चित होऊन महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) त्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबवली. समांतर रस्ते व महामार्ग चौपदरीकरणाच्या मागणीचा जसा खेळ झाला तसा या निविदा प्रक्रियेचाही "खेळखंडोबा' करण्यात आला. दोनवेळा निविदेत बदल करून ती प्रसिद्ध करण्यात आली व नंतर तीनवेळा त्यास मुदतवाढही देण्यात आली. अद्यापही निविदेचा घोळ संपलेला नाही. 12 मार्चपर्यंत ऑनलाइन निविदा मागविण्याची मुदत होती. 13 मार्चला त्या उघडणे अपेक्षित होते. मात्र, आज पुन्हा निविदा उघडण्याची प्रक्रिया गुरुवारवर (ता.14) ढकलण्यात आली. 
 
काम सुरू होण्यास दोन महिने 
चौपदरीकरणात खोटेनगरजवळील आहुजानगर ते कालिंकामाता चौक या सात किलोमीटरच्या टप्प्यातील काम होणार आहे. गुरुवारी या कामाच्या निविदा उघडल्यानंतरही पात्र निविदेचे मूल्यांकन (इव्हॅल्युएशन) करण्यात येईल. त्यानंतर संबंधित निविदा "न्हाई'कडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. निविदा मंजुरीस किती वेळ लागतो, हे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या निविदेवरुन लक्षात येते. निविदा मंजुरीनंतर मक्तेदार कंपनी अनामत जमा करण्यासह आर्थिक नियोजन सादर करेल. त्यानुसार करार होऊन कार्यादेश दिले जातील. या कामाला किमान दोन महिने तरी लागतील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून 23 मेस निकाल आहे, त्यानंतर आचारसंहिता संपेल. त्यामुळे आचारसंहितेची अडचण असो किंवा नसो, महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यास दोन महिने तरी लागणार आहेत. 

Web Title: marathi news jalgaon 4 way road aacharsanhita