मूकबधिर तरुणीशी हुंडा न घेता केला आदर्श विवाह 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

जळगाव : पाच बहिणी आणि त्यांची विधवा निराधार आई.. प्रतिकूल स्थितीत मुलींचे संगोपन करत त्यांना मोठं केलं.. पण, विवाह लावून देण्याइतपत आर्थिक स्थिती नाही.. त्यातही एक मुलगी जन्मापासूनच मूकबधिर... तिचं कसं होणार, या विवंचनेत असलेल्या त्या विधवा मातेसाठी एक तरुण "देव' बनूनच समोर आला. तरुणानं या मुलीला स्वीकारले, एक पैसाही न घेता विवाहासाठी होकार भरला अन्‌ या दोघांचा हा आदर्श विवाह आज अमळनेर तालुक्‍यातील ढेकू येथे पार पडला.. 

अमळनेर तालुक्‍यातील ढेकू येथील रहिवासी प्रभाकर निळकंठ मोरे यांची मुलगी भाग्यश्री जन्मापासूनच मूकबधिर. पित्याचे छत्र हरविल्यानंतर विधवा आई श्रीमती प्रतिभा यांनी तिच्यासह पाच मुलींचे संगोपन केले. प्रतिकूल स्थितीत या कुटुंबाने दिवस काढले. भाग्यश्रीच्या व्यंगामुळे तिचं लग्न कसं जमेल, याची चिंता प्रतिभा यांना सतावत होती. 

जितेंद्रने स्वीकारले 
गावातीलच शेतकरी भीमराव धोंडू पाटील यांचा मुलगा जितेंद्र हा होतकरू तरुण. शेतीकामासह खासगी कंपनीत तो अमळनेर येथे नोकरी करतो. त्याने भाग्यश्रीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे जितेंद्रने भाग्यश्रीला आहे त्या स्थितीत एकही रुपयाचा हुंडा न घेता स्वीकारायचे ठरविले. त्यानुसार आज या दोघांचा विवाह अत्यंत उत्साहात पार पडला. जितेंद्रच्या या आदर्श व प्रेरणादायी निर्णयाचे गावपरिसरातील नागरिकांनी कौतुक केले. हा विवाह जुळविण्यासाठी वसंत पाटील, नितीन पाटील, प्रा. सुनील गरुड, विजय बाविस्कर आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: marathi news jalgaon aadarsh vivah