जिल्हाभरात "जय भीम'चा गजर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

जळगाव ः "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय...जय भीमचा घोष हजारो भीम अनुयायांच्या मुखातून अवतरला. याच जयघोषात संपुर्ण जिल्ह्यात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका आणि त्यातील सजीव देखाव्यांनी महामानवास अभिवादन करत आठवणींना उजाळा देण्यात आला. 

जळगाव ः "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय...जय भीमचा घोष हजारो भीम अनुयायांच्या मुखातून अवतरला. याच जयघोषात संपुर्ण जिल्ह्यात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका आणि त्यातील सजीव देखाव्यांनी महामानवास अभिवादन करत आठवणींना उजाळा देण्यात आला. 

समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी जळगावातील रेल्वेस्थानकाजवळील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उसळलेला जनसागर रात्री उशिरापर्यंत कायम होता. शिवाय काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये दीक्षाभूमीचा देखावा, सजीव देखावे, चित्ररथांच्या मिरवणुका लक्षवेधी होत्या. विविध संघटनांच्यावतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. 

उत्सव समितीतर्फे अभिवादन सभा 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगर जयंती उत्सव समितीतर्फे सकाळी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर ललीत कोल्हे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, बहुजन क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक मुकूंद सपकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेपुर्वी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

127 किलोचा कापला केक 
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील भिमराज ग्रुपच्यावतीने दरवर्षी केक कापण्याचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. त्यानुसार यंदाच्या 127 व्या जयंतीनिमित्ताने भिमराज ग्रुपतर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळी साडेआठला 127 किलोचा केक कापण्यात आला.

Web Title: marathi news jalgaon aambedkar jayanti