आषाढात श्रावण सरींचा प्रत्यय ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

जळगाव ः पावसाने यंदा चांगली सुरवात केली असली तरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून होती. तुरळक पावसाच्या सरी रोज येत होत्या. दमदार पाऊस अद्याप झालेला नव्हता. आषाढातील पहिला दिवस श्रावण सरींचा प्रत्यय असे चित्र आज दिवसभर शहरात पाहण्यास मिळाले. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन मुसळधार पाऊस झाला. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. यानंतर अधूनमधून पावसाचे आगमन सुरूच होते. परंतु जिल्ह्यात सरासरी इतका अपेक्षित असलेला पाऊस अद्याप झालेला नव्हता. श्रावणातील पावसाच्या झळीपूर्वी आषाढ महिन्यात अनेकदा दमदार पाऊस होत असतो. आषाढाचा आज पहिलाच दिवस असून अगदी सकाळपासून श्रावणसरी बरसत असल्याचा अनुभव आला. ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहून कधी तुरळक पाऊस होऊन ऊन पडत होते. तर अचानक जोरदार पावसाच्या सरी येऊन लागलीच ऊन पडत होते. 

मुसळधार 
दिवसभर ऊन- सावली आणि पावसाचा खेळ झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली. यानंतर अवघ्या पाच मिनिटात मुसळधार पावसाला सुरवात झाली. अशा दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून होती. साधारण एक तास जोरदार पाऊस झाल्यानंतर पाऊस सुरूच होता. मुसळधार पावसामुळे बाजारात आलेल्या नागरिकांची व सायंकाळी रस्त्यावर गाड्या लावणाऱ्या हॉकर्सची धावपळ उडाली. 

रस्त्यांवर पाणीच पाणी 
सायंकाळी एक तास चाललेल्या जोरदार पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. शिवाय, प्रमुख रस्त्यांवर देखील गुडघ्या इतके पाणी साचले होते. यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत होत होती. शाहूनगराकडून पिंप्राळा रेल्वे गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी साचले होते. बजरंग बोगदा देखील पाण्याने तुडुंब भरलेला होता. नवीपेठ, रेल्वे स्टेशनरोड, गणेश कॉलनी येथील रस्त्यांवर देखील पाणी साचले होते. तर जोरदार पावसामुळे नाल्यांना देखील पाणी आले होते.

Web Title: marathi news jalgaon aashad rain dropd