शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

जळगाव : जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन हे प्रयत्नशील होते. दोन वर्षांपूर्वी त्यास मान्यता मिळून प्रवेश देखील झाले होते. त्यानंतर, पुन्हा त्या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्यास आज मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगांवकरांना अनोखी भेट मिळाली असून, 100 विद्यार्थ्यांना बीएएमएस वर्गात प्रवेश मिळणार आहे. 

मंत्री महाजन यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळावी, यासाठी मेडिकल हब हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. यात 11 महिन्यात एमबीबीएसच्या 100 जागांना मान्यता मिळाली. याच एमबीबीएसची प्रवेश क्षमता वाढवून 150 करण्यात आली. तसेच चिंचोली शिवारात 135 एकरात भव्य वास्तुची तयारी सुरू आहे. अशातच आता आयुर्वेद महाविद्यालयाला मान्यता मिळाल्याने जळगावकरांसाठी अनोखी भेट ठरली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aayurved callage