पॅजो रिक्षा पलटून दोघांचा मृत्यू; सात जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

जळगाव ः पाचोरा तालुक्‍यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथे आज सकाळी न्हावी तांडा (ता.सोयगाव) येथील अकरा मुलांची टिम क्रिकेट स्पर्धेसाठी गेले होते. क्रिकेट खेळून परत येत असताना पॅजो रिक्षा पलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे अत्यवस्थ असून, अन्य दोघेजण जखमी झाले आहे. सदर घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. न्हावी तांडा (ता.सोयगाव) येथून प्रिंप्री डांभूर्णी (ता.पाचोरा) येथे आयोजित क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जात असतांना येथील कवली रस्त्यावर पॅजो रिक्षा उलटी झाली. त्यात सर्व पंचविशीच्या आतील वयाचे मुले प्रवास करत होते. यातील दोन जण जागीच ठार झाले. तर इतर जखमी झाले.

जळगाव ः पाचोरा तालुक्‍यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथे आज सकाळी न्हावी तांडा (ता.सोयगाव) येथील अकरा मुलांची टिम क्रिकेट स्पर्धेसाठी गेले होते. क्रिकेट खेळून परत येत असताना पॅजो रिक्षा पलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे अत्यवस्थ असून, अन्य दोघेजण जखमी झाले आहे. सदर घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. न्हावी तांडा (ता.सोयगाव) येथून प्रिंप्री डांभूर्णी (ता.पाचोरा) येथे आयोजित क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जात असतांना येथील कवली रस्त्यावर पॅजो रिक्षा उलटी झाली. त्यात सर्व पंचविशीच्या आतील वयाचे मुले प्रवास करत होते. यातील दोन जण जागीच ठार झाले. तर इतर जखमी झाले. जखमींना येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे होते. यानंतर सर्व जखमींना जळगाव येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Web Title: marathi news jalgaon accident