दुचाकीचालकास वाहनाने चिरडले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

जळगाव : औरंगाबाद - जळगाव महामार्गावरील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर आज रात्री सव्वाबाराच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले. या घटनेत दुचाकीचालक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. 

जळगाव : औरंगाबाद - जळगाव महामार्गावरील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर आज रात्री सव्वाबाराच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले. या घटनेत दुचाकीचालक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. 
शहराकडून दुचाकीचालक (एमएच 19, जेएच 4993) शहराकडून एमआयडीसीकडे येत होता. याचवेळी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात वाहनाच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. दरम्यान, मृत दुचाकीस्वाराच्या खिशात मोबाईल आढळून आला. मात्र मोबाईलचा चुराडा झाला असून, आळख पटविण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. तर गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 
औरंगाबाद महामार्गावर एमआयडीसी परिसरात पोलिस ठाण्यासमोरच अपघात झाल्याने तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्री उशिरापर्यंत मृत व जखमी तरुणाची ओळख पटली नव्हती. 

Web Title: marathi news jalgaon accident daith