कंटेनरची टाटा इंडिगोला धडक; तीन ठार, एक जखमी 

live photo
live photo

चोपडा : बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर चोपडा शहरापासून सात किमी अंतरावरील काजीपुरा फाट्यालगत कंटेनरने टाटा इंडिगो कारला जोरदार धडक दिली. त्यात इंडिगो गाडीतील तीन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे. 
सदर अपघात आज पहाटे साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातातील जखमीला उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. वाळूचे व्यावसायिक व वाळूच्या ट्रॅक्‍टरवरील चालक असलेले किशोर गजानन बिऱ्हाडे (35, रा.भाटपुरा, ता.शिरपूर),अनिल दशरथ जाधव (22, रा.बभळाज, ता.शिरपूर ) व मांजरोद ग्रामपंचायत सदस्य तथा शिरपूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव गुलाब कोळी (37, रा.मांजरोद, ता.शिरपूर) हे तीघेजण जागीच ठार झाले. तर सागर नरेंद्र पाटील (19, रा.अजनाड, ता.शिरपूर) गंभीर जखमी झाले आहेत. 
इंडीगो कारमधील चारही जण वाळूच्या ट्रॅक्‍टरवर चालक असून रात्री ड्युटी करून टाटा इंडिगो (क्रमांक एमएच 14- सीएक्‍स 9013) कारने शिरपूरकडे जात असतांना चोपडाकडे येणाऱ्या ट्रालाने इंडिगो कारला समोरून धडक दिली. ट्रालाचा वेग इतका होता की टाटा इंडिगो कारला धडक देऊन दहा ते बारा फूट अंतरापर्यंत ओढत नेले. ट्राला पलटी झाला असून, कार चक्काचूर झाली आहे. अपघातातील मृतांचे शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हारुग्णालयात करण्यात आले. डॉ. नरेंद्र पाटील यांनी शवविच्छेदन केले. यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी, सुनील कोळी, मधुकर पवार आदींनी पंचनामा करून कार्यवाही केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com