जळगाव जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जिल्ह्यासोबत जळगाव शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागलेली असून ही चिंताजनक गोष्ट आहे​

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, 'जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 49 व्यक्ती तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहे. त्यापैकी 44 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

नक्की वाचा :  डोळ्यासमोर बहिणेचे झाले अपहरण... अन्‌ चार जिल्ह्यातील पोलिस उतरले महामार्गावर ! 
 

जिल्ह्यासोबत जळगाव शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागलेली असून ही चिंताजनक गोष्ट आहे. त्यात सकाळी पाच जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले असून आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील दोन तर अमळनेर, भडगाव, धरणगावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 351 इतकी झाली आहे. त्यात काल जळगाव शहरात तीन रुग्ण आढळले असून 

शिवाजीनगरातील ट्रक चालक बाधित 
शहरातील नवनवीन भागात कोरोना बाधित आढळून येत असल्याने धोका वाढला आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही कुठल्याही नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. शहरातील तीन कोरोनाबाधितांचा अहवाल बुधवारी रात्री आला, त्यात दाट वस्ती असलेल्या शिवाजीनगरातील ट्रक चालकासह मारोतीपेठेतील मृत वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य एक रूग्णाच्या परिसराचा 
शोध सुरू आहे. 

आतापर्यंत 13 प्रभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण 
आतापर्यंत आढळून आलेल्या प्रभागातील सर्व भाग कन्टेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरातील दाट वस्ती असलेल्या शिवाजीनगतील संभाजी चौकातील 50 वर्षीय ट्रक चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन तीन दिवसांपासून या ट्रक चालकाला कोरोना सदृश लक्षणे जाणवत असल्याने कोव्हीड रुग्णालयात दाखल केले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच महापालिकेकडून संपूर्ण परिसर सील देखील करण्यात आला आहे. 

क्‍लिक कराः यावल टायगर कॉरिडोर बनलाय संवेदनशील 
 

मारोतीपेठेतील मृताचा अहवाल पॉझिटिव्ह 
शहरातील मारोतीपेठेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. याठिकाणी यापूर्वी 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. यातील दोन जणांनी कोरोनावर मात केली असून 1 जणांवर कोव्हीड रुग्णालयात उपचार सुरू आहे. या परिसरातील रंगारी वाड्यातील एका 65 वर्षीय इसमाचा अहवाल बाधित आला आहे. परंतु हे वृद्धाचे मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असून त्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत देखील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची 
शक्‍यता नाकारता येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon agin five corona patients report positive