दर्जेदार मालास हमीभाव न दिल्यास गुन्हा दाखल : जिल्हा उपनिबंधक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीचा शेतमाल (एफएक्‍यू) शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधित व्यापारी, बाजार समितीवर गुन्हा करू, असा इशारा जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिला आहे. 
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी शासनाकडून हमीभावाने शेतमाल खरेदी करावा, असे पत्र आलेले नसल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्याविषयावर श्री. जाधवर यांना विचारले असता ते बोलत होते. 

शेतकऱ्यांना अधिकाधिक हमीभाव मिळविण्यासाठी शेतकरी संघटना प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये माल खराब असल्याचे भासवून लूट होत आहे. याबाबत अनेक शेतकरी संघटनांनी तक्रारी केल्या आहेत. यावर श्री. जाधवर म्हणाले, की शासनाने ज्या शेतमालाचा हमीभाव जाहीर केला, तो शेतमाल त्याच भावात खरेदी केला जावा. तसे न झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यास संबंधित खरेदीदारावर गुन्हा नोंदविला जाईल. बाजार समिती, व्यापारी यांनीही हमीदरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करू नये. 
 
Web Title: marathi news jalgaon agro hamibhav