महिनाभरात वाढले अकरा टॅंकर! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

महिनाभरात वाढले अकरा टॅंकर! 

जळगाव,  : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मे हिटच्या तडाख्याने सारेच हैराण झाले आहे. वाढत्या तापमानाबरोबरच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवत असून महिनाभरात टॅंकरची संख्या 44 वरून 55 वर पोचली आहे. सद्य:स्थितीत 89 गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून 55 गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

जिल्ह्यातील 889 गावे पाणीटंचाईच्या आराखड्यात घेण्यात आली आहेत. पावसाळा कमी झाल्याने मे- जून महिन्यापर्यंत काही तालुक्‍यात पाणी टंचाईचे संकट अधिक भीषण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 29 कोटी 50 लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. याद्वारे टंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान जामनेर तालुक्‍यात 22 तर अमळनेर तालुक्‍यात 43 गावांना पाणीटंचाईच्या झळा तीव्र असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे. 

160 गावांसाठी विहिरी अधिग्रहीत 
जिल्ह्यातील 160 गावांमध्ये 159 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. त्यात जामनेर तालुक्‍यात 31, अमळनेर तालुक्‍यात 37 तर पारोळा तालुक्‍यात 12 विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. तसेच 20 गावांमध्ये तात्पुरत्या पाणी योजना सुरू करण्यात आल्या असून 119 गावांमध्ये 318 विंधन विहिरी सुरू करण्यात आल्या आहेत. तर 44 गावांमध्ये 97 कूपनलिका सुरू करण्यात आल्या आहेत. 
---------------- 
भीषण पाणीटंचाईचे तालुक्‍यांची स्थिती 
तालुका गावे टॅंकरची संख्या 
अमळनेर 43 20 
जामनेर 22 18 
पारोळा 15 09 
,.................

Web Title: marathi news jalgaon akra