अतिक्रमणास समर्थनप्रकरणी अमळनेरचे 22 नगरसेवक अपात्र 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

अमळनेर ः शहरातील अतिक्रमणास समर्थन दिल्याप्रकरणी अमळनेरच्या 22 नगरसेवकांना जिल्हादिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. पालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीने केलेल्या ठरावाबाबत विद्यमान आमदार शिरीष चौधरींच्या आघाडीतर्फे या नगरसेवकांविरोधात तक्रार करण्यात आली होती. 

अमळनेर ः शहरातील अतिक्रमणास समर्थन दिल्याप्रकरणी अमळनेरच्या 22 नगरसेवकांना जिल्हादिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. पालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीने केलेल्या ठरावाबाबत विद्यमान आमदार शिरीष चौधरींच्या आघाडीतर्फे या नगरसेवकांविरोधात तक्रार करण्यात आली होती. 
ेआमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे पालिकेतील गटनेते प्रवीण पाठक, नगरसेविका सविता संदानशिव, सलीम शेख चिरागोद्दीन शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षांसह नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची तक्रार दाखल केली होती. यावर तत्कालिन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र केले होते. त्यानंतर हा निकाल राज्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला होता. राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अभय मिळाल्याने नगराध्यक्षांसह नगरसेवकांना काही काळ दिलासा मिळाला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्याची मुदतवाढ घेतली होती. त्याअनुषंगाने अखेर आज हा निकाल देण्यात आला आहे. या नगरसेवकांसोबतच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे यांच्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
दरम्यान, अतिक्रमणाबाबत ठरावाचे समर्थन करणाऱ्या उर्वरीत नगरसेवकांपैकी आठ नगरसेवकांना स्वतंत्र बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांचा योग्य तो आदेश नंतर दिला जाणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon amalner palika 22 nagar sevak