"अमृत'च्या कामासाठी अधिकाऱ्यांना हवी टक्केवारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

जळगाव ः शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत 
आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचा निष्काळजी कारभार असून, अमृत योजनेच्या कामासाठी मक्तेदाराला महापालिकेचे अधिकारी टक्केवारी मागत असल्याने महापालिका प्रशासनाला वैचारिक आजारपण आले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला. 

महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे उपस्थित होते. श्री. महाजन म्हणाले, की शहरात सर्वत्र अस्वच्छता असून, आरोग्य अधिकारी यावर अंकुश नाही. अमृत योजनेचे काम सुरू असून, मक्तेदाराला संबंधित विभागाचे अधिकारी टक्केवारी मागत आहे. त्यामुळे कामे अमृतचे कामे हळूवार सुरू आहे. शहरात पुन्हा अतिक्रमण वाढले असून, सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणूक होत नाही तोवर अतिक्रमण न काढण्याचे सांगितले आहे. तसेच शहर स्वच्छतेचा एकमुस्त ठेका वॉटर ग्रेस कंपनीला देण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा असल्याचेही ते म्हणाले. 
नवीन अग्निशमन गाड्या तयार करण्यासाठी 1 कोटी 95 लाखांचा निधी असूनही त्याचा वापर होत नाही. महापालिका प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी जर हा प्रश्‍न 23 मेपर्यंत मार्गी न लावल्यास शिवसेना  स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

Web Title: marathi news jalgaon amrut yojna parcentage