भूमिगत गटारी योजनेच्या कामाचे मनपाकडून कार्यादेश 

भूमिगत गटारी योजनेच्या कामाचे मनपाकडून कार्यादेश 

जळगाव : शासनाकडून शहरासाठी अमृत योजनेंतर्गत मंजूर मलनिस्सारण व भूमिगत गटारी योजनेच्या कामाचे आज मक्तेदाराला महापालिकेकडून कार्यादेश देण्यात आले. त्यामुळे भूमिगत गटारींच्या कामाला मक्तेदाराकडून लवकरच सुरवात होणार आहे. 
अमृत योजनेंतर्गत शहरास 160 कोटींची मलनिस्सारण व भूमिगत गटारी योजना मंजूर आहे. तसेच निविदा प्रक्रिया राबवून एलसी इन्फ्रा प्रोजेक्‍टस प्रा. लि. (अहमदाबाद, गुजरात) हा मक्तेदार निश्‍चित केला आहे. त्यानुसार मक्तेदाराचे प्रतिनिधी निकेश नाकरानी यांना आज महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते कार्यादेश देण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, स्थायी समिती सदस्य चेतन सनकत, शहर अभियंता सुनील भोळे, प्रकल्प शाखा अभियंता योगेश बोरोले हे उपस्थित होते. 

असे होईल काम 
पहिल्या टप्प्याचे काम अडीच वर्षे चालणार आहे. यात शहरातील विविध भागामध्ये भूमिगत गटारी तयार केल्या जाणार आहेत. यात कानळदा रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर, इंद्रप्रस्थनगर, एस. के. ऑइल मिल, खडकेचाळ, क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय परिसर, महावीर जिनिंग फॅक्‍टरी, संभाजी चौक, अमर चौक उस्मानिया पार्कपर्यंतचा शिवाजीनगरचा संपूर्ण परिसर, प्रजापतनगर, हरिओमनगर, मोहन थेटर परिसर, कांचननगर, शनीपेठ, बालाजी पेठ, बळीरामपेठ, शंकररावनगर, दशरथनगर, ज्ञानदेवनगर, बहिणाबाई चौधरी जलकुंभ परिसर, संपूर्ण जुने जळगाव परिसर, कालिंकामाता चौक परिसर, अजिंठा चौफुली, रॉयल फर्निचर, मेहरुण परिसर, मेहरुण तलावाच्या आजूबाजूचा परिसर, मोहननगर, आरटीओ ऑफिसचा रस्ता, काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, रेल्वेस्टेशन या सीमेतील भागांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com