अर्थतज्ज्ञ बोकील आज जळगावात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

जळगाव : "सकाळ'चे संस्थापक संपादक पत्रमहर्षी (कै.) डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आज (ता.20) अर्थक्रांती ट्रस्टचे चेअरमन व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 
"सकाळ'चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांची 122 वी जयंती आज (ता.20) आहे. "सकाळ'तर्फे या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मालिकेत वैचारिक व्याख्यानाची मेजवानी जळगावकरांसाठी आयोजित करण्यात आली आहे. 

"मंदीतून संधीकडे..' 
सध्या जगभरासह भारतातही आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे. भारतातील विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीचे चित्र असल्याचे समोर येत आहे. या स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने यंदा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व अर्थक्रांती ट्रस्टचे चेअरमन अनिल बोकील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. 20 तारखेला सायंकाळी पाचला कांताई सभागृहात श्री. बोकील "मंदीतून संधीकडे..' या विषयावर आपले विचार मांडतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल राव असतील. व्याख्यान सर्वांसाठी खुले असून, व्याख्यानाचा जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे. 

अनिल बोकील यांचा परिचय 
अनिल बोकील हे मूळ मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी. ते मेकॅनिकल इंजिनिअर असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते देशातील अर्थव्यवस्थेसंबंधी विविध बाबींचा अभ्यास करीत आहेत. अर्थ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असून, त्यातूनच त्यांनी अर्थक्रांती ट्रस्टची स्थापना केली. 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली नोटबंदी अर्थक्रांतीच्या शिफारसीतून केली होती. त्यामुळे श्री. बोकील यांच्या व्याख्यानाचे विशेष महत्त्व आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon anil bokil leacture