गोटे आमदार होणार नाहीत; धुळेकरांची मला काळजी : गिरीश महाजन  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

जळगाव ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातील नागरिकांची मला काळजी वाटते. यात लोकसंग्राम संघटनेतर्फे उमेदवारी करणारे माजी आमदार अनिल गोटे हे निवडून येणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, ते आमदार होणार नाहीत, असे खळबळजनक विधान भाजपप्रणीत राज्य सरकारचे संकटमोचक आणि प्रतिमुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. 

डिसेंबरमध्ये येथील महापालिकेची निवडणूक झाली. तिच्या नेतृत्वावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि त्यावेळी असलेले भाजपचे येथील आमदार गोटे यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला. यात श्री. गोटे यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनाही विविध आरोपांतून उघडपणे शिंगावर घेतले होते. मंत्री महाजन यांच्यावरही आरोपातून चिखलफेक केली होती. या वादात भाजपने महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. नंतर श्री. गोटे यांनी वेगळी चूल मांडत आमदारकीचा राजीनामा दिला. 

गोटेंची शेवटची "टर्म'! 
असे असताना विधानसभा निवडणुकीतून धुळ्यात चौथ्यांदा आमदार होणार असून, जो पक्ष कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षात प्रवेश करेल, तोपर्यंत लोकसंग्राम संघटनेतर्फे उमेदवारी करणार असल्याची भूमिका श्री. गोटे यांनी समर्थकांच्या बैठकीत जाहीर केली. या संदर्भात मंत्री महाजन म्हणाले, की धुळेकरांची मला काळजी वाटते. त्यामुळे श्री. गोटे निवडून येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. त्यांची ही शेवटची "टर्म' असेल. श्री. गोटे हे आमदार होणार नाहीत. मंत्री महाजन यांच्या या खळबळजनक विधानामुळे धुळे शहर मतदारसंघातील राजकारणात रंग भरला जाणार असून, निकालापर्यंत उत्सुकता शिगेला ताणली जाईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon anil gote not MLA mahajan dhule