प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी "स्मार्ट काउशेड' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

जळगाव ः "गोदावरी अभियांत्रिकी'च्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी "स्मार्ट काउशेड ऑटोमेशन'चे संशोधन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षल पाटील, आरती चौधरी आणि यतीन पाटील या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्‍टमध्ये गायीचा गोठा हा पूर्णपणे ऑटोमेटेड केला असून, यात गुरांचा चारा, पाणी देणे तसेच गोठ्याची स्वच्छता अशी सर्व कामे, याचबरोबर गुरांच्या सुरक्षतेसाठी फायर सेन्सर वापरून आग विझविण्याची प्रणाली अमलात आणली आहे. आग लागल्यानंतर दार आपोआप उघडून गुरे बाहेर पडतील. तसेच पाण्याचा फवाऱ्याद्वारे आग विझविण्याची क्षमता प्रोजेक्‍टमध्ये आहे.

जळगाव ः "गोदावरी अभियांत्रिकी'च्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी "स्मार्ट काउशेड ऑटोमेशन'चे संशोधन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षल पाटील, आरती चौधरी आणि यतीन पाटील या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्‍टमध्ये गायीचा गोठा हा पूर्णपणे ऑटोमेटेड केला असून, यात गुरांचा चारा, पाणी देणे तसेच गोठ्याची स्वच्छता अशी सर्व कामे, याचबरोबर गुरांच्या सुरक्षतेसाठी फायर सेन्सर वापरून आग विझविण्याची प्रणाली अमलात आणली आहे. आग लागल्यानंतर दार आपोआप उघडून गुरे बाहेर पडतील. तसेच पाण्याचा फवाऱ्याद्वारे आग विझविण्याची क्षमता प्रोजेक्‍टमध्ये आहे. गुरे चोरण्याचा किंवा बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्यास अलार्मची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी आपोआप लाइट लागतील, तसेच पाणीही हौदामध्ये भरले जाणार आहे. हौद पूर्ण भरल्यावर नळ आपोआप बंद होणार असल्याने मानवाचे श्रम वाचणार आहे. ही पूर्ण सिस्टिम पीएसी बेसड्‌ अत्यल्प खर्चात तयार केली आहे. विद्यार्थ्यांच्या या संशोधनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जी. अराजपुरे, उपप्राचार्य प्रवीण फालक यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon animal smart cowshed