एटीएम'मधील गैरप्रकार रोखणारे तंत्रज्ञान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

जळगाव : सध्या एटीएम मशिनमधून चोरीचे, गैरव्यवहाराचे प्रकार वाढले असून त्यांना आळा घालण्यासाठी बांभोरी अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी आधुनिक एटीएम मशिनची संकल्पना राबवत एक मॉडेल विकसित केले आहे. यामुळे कार्ड चोरी, बनावट कार्ड, पासवर्ड बघणे या प्रकारांना आळा बसेल. 

एसएसबीटी बांभोरी अभियांत्रिकीमधील इलेक्‍ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन शाखेतील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी स्वप्नील पाटील, अक्षय बुरुजवाले, शुभम अकोले आणि असीम मन्सुरी यांनी हे आधुनिक एटीएम मशिनचे मॉडेल तयार केले आहे. हा प्रोजेक्‍ट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राध्यापक एस.के. खोंडे व प्रा. अमोल वाणी, विभाग प्रमुख डॉ.एस.आर. सुरळकर यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
असे आहे तंत्रज्ञान 
या मशिनमध्ये पैसे काढताना मागून पासवर्ड बघणे अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी "शफलिंग किपॅड' वापरले आहे. त्यामुळे युजर्सनंतर त्या नंबर सिरिजमध्ये बदल होतो. त्यामुळे पासवर्ड कोणालाही कळणार नाही. यात फिंगर प्रिंटचा देखील वापर केला आहे. आजकाल आधार कार्डला फिंगर प्रिंट जोडलेले असल्याने ही सिस्टिम आधुनिक आणि सुरक्षित या दोघींचा मेळ आहे. यासोबतच मोबाईल वर ओ.टी.पी. आल्यानंतर तो टाकल्यावरच पैसे एटीएममधून काढू शकता. या मशीनसाठी आठ हजार रुपये खर्च आला. 
 
असे आहेत फायदे 
- युजर्सची माहिती सुरक्षित 
- पैसे काढल्यानंतर सिरिजमध्ये बदल 
- फिंगर प्रिंटचा वापर 
- ओटीपी टाकल्यावरच पैसे 
- गैरप्रकाराला आळा 
 
Web Title: marathi news jalgaon atm resurch