कर्नाटकच्या एटीएस पथकाची साकळीत चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

यावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी सूर्यवंशी यास राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले होते. आज एटीएसच्या पथकासोबत गावात आल्यामुळे त्याचे घर व दुकानाजवळ बघ्यांनी गर्दी केली होती. 

बंगळूरच्या एटीएस पथकाने सूर्यवंशी यास आज दुपारी साकळी येथे चौकशीसाठी आणले होते. त्याच्या घरी दहा ते पंधरा मिनिटे थांबून घरातील कागदपत्रांची तपासणी करून पथकाने सूर्यवंशी यास मनवेल रोडवरील माणकी नदी परिसरात त्यास चौकशीसाठी नेले. एटीएस पथकाच्या चौकशीत काही धागेदोरे हाती लागले का ? याविषयी अधिकृत खुलासा होऊ शकला नसला तरी ग्रामस्थांमध्ये मात्र चर्चेला उधाण आले होते. बंगळूरच्या एटीएस पथकाने वासुदेव सूर्यवंशी यास पुरोगामी विचारसरणीचे ज्येष्ठ नेते ऍड. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मारेकऱ्यांना मोटारसायकल व पिस्तूल पुरविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बंगळूरच्या एटीएस पथकाने गेल्या आठ दिवसांपूर्वी सूर्यवंशी यास ताब्यात घेण्यात आले आहे. 
दहा वर्षांपासून साकळीत मोटर सायकल दुरुस्तीचे दुकान चालवणारा, अध्यात्माचे वेड असलेला, शांत स्वभावाचा, शिवभक्त वासुदेव सूर्यवंशी परिचित होता. मात्र तीन महिन्यांपूर्वी नालासोपारा बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसच्या पथकाने त्यास ताब्यात घेतल्यानंतर साकळीसह तालुक्‍यात त्याच्या अटकेविषयी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला होता.

Web Title: marathi news jalgaon ATS team sakhdi hearing