अमळनेरला शोषखड्ड्याने  घेतला चिमुरड्याचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

अमळनेर : गांधलीपुरा भागातील नदीकाठावर पर्यायी रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे एक शोषखड्डा तयार केला असून, यात सांडपाणी साचले आहे. अजय रंगराव चव्हाण (वय दोन) हा चिमुरडा आज सकाळी साडेआठच्या सुमारास तीनचाकी सायकलने खेळत असताना त्या खड्ड्यात पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

अजयचे आई- वडील हातमजुरी करून उदरनिर्वाह भागवत असून, या घटनेने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अजयचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. अजयचे वडील रंगराव चव्हाण यांनीच फावड्याने त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून, बांधकाम कंत्राटदाराच्या चुकीने शोषखड्ड्यात चिमुरड्याचा बळी गेल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. 

Web Title: marathi news jalgaon baby death

टॅग्स