सोळापैकी दोनच वाळूगटांचा लिलाव 

सोळापैकी दोनच वाळूगटांचा लिलाव 

जळगाव: जिल्ह्यातील वाळूगटांचा लिलाव गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. यातील काही वाळूगटांचा लिलाव गेल्या महिन्यात झाले. परंतु, उर्वरित 16 पैकी केवळ 2 दोन गटांचा लिलाव आज झाला. निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने वाळूचोरीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. 
पर्यावरण विभागाने परवानगी नाकारल्यामुळे गेल्या वर्षी वाळूगटांचे लिलाव रखडले होते. त्यामुळे वाळूमाफियांकडून सर्रासपणे वाळूचोरी केली जात होती. जिल्ह्यात तापी, गिरणा, सुकी, बोरी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. या नद्यांमध्ये प्रशासनाकडून सुमारे 27 वाळूगट असून गेल्या महिन्यात या वाळूगटांपैकी 7 वाळूगटांचा लिलाव झाला होता. यातील 16 वाळूगटांचा लिलाव रखडलेला होता. दरम्यान, आज या 16 वाळूगटांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. यामध्ये चोपडा तालुक्‍यातील सुटकार, तर भुसावळ तालुक्‍यातील भानखेडा या वाळूगटांचा लिलाव पार पडला. यामध्ये सुटकार वाळूगटाचा लिलाव हा 28 लाख रुपयांना, तर भानखेडाचा लिलाव 14 लाख 74 हजार रुपयांचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला. 

14 गटांचा लिलाव रखडले 
वाळू उपसा करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने वाळू कंत्राटदारांकडून वाळू गटाच्या लिलावाकडे पाठ फिरवली आहे. प्रशासनाने लिलाव करण्यास उशीर केल्यामुळे अद्याप 14 वाळूगटांचा लिलाव रखडला आहे. 

निविदेला प्रतिसाद अत्यल्प 
वाळू गटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असतो. परंतु, गेल्या आठ महिन्यांपासून वाळू गटांचा लिलाव रखडलेले होते. आता वाळूचा उपसा करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये नदीपात्रात धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जाईल. त्यानंतर वाळू उपसा बंद होणार असल्याने वाळू गटांच्या लिलावाच्या निविदा भरत नसल्याने निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्हा प्रशासनाचा महसूल बुडाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com