भारतात प्रथमच "बलून बंधारे' 

सुधाकर पाटील
रविवार, 30 डिसेंबर 2018

भडगाव  : गिरणा नदीवरील प्रशासकीय मान्यता मिळालेले बलून बंधारे हे भारतात पहिले बंधारे ठरणार आहे. देशात कुठेही अशा प्रकारचे बंधारे नाही. त्यामुळे हे सात बंधारे देशासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार आहेत. अमेरिका व चीनची टेक्‍नॉलॉजी असलेले हे बंधारे हवेच्या दाबाने स्वयंचलित नियंत्रित होणार आहे. याबंधाऱ्यांमुळे पारंपरिक बंधाऱ्याच्या तुलनेने 30 टक्के खर्चाची बचत होणार आहे. शासनाकडून पूर्ण निधी मिळाल्यास दोन वर्षांत बलून पूर्णत्वास येतील. 

भडगाव  : गिरणा नदीवरील प्रशासकीय मान्यता मिळालेले बलून बंधारे हे भारतात पहिले बंधारे ठरणार आहे. देशात कुठेही अशा प्रकारचे बंधारे नाही. त्यामुळे हे सात बंधारे देशासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार आहेत. अमेरिका व चीनची टेक्‍नॉलॉजी असलेले हे बंधारे हवेच्या दाबाने स्वयंचलित नियंत्रित होणार आहे. याबंधाऱ्यांमुळे पारंपरिक बंधाऱ्याच्या तुलनेने 30 टक्के खर्चाची बचत होणार आहे. शासनाकडून पूर्ण निधी मिळाल्यास दोन वर्षांत बलून पूर्णत्वास येतील. 
गिरणा नदीवरील गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बलून बंधाऱ्यांना काल राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याने गिरणापट्ट्यात आनंदाला उधाण आले आहे. आज दिवसभर गावागावात बलून बंधाऱ्याचीच चर्चा होती. तर 'सकाळ'वरही शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला. 
भारतात आतापर्यंत पारंपरिकपद्धतीने नद्यांवर बंधारे करण्यात आले आहेत. मात्र, गिरणा नदीवर अमेरिका व चीन देशाने वापरलेल्या तंत्रज्ञानावर आधारित बलून बंधारे करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे देशातले पहिले बंधारे ठरणार आहे. त्यामुळे केंद्राने या सात बंधाऱ्यांना 'पायलट प्रोजेक्‍ट' म्हणून मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्‍यक 711 कोटीचा पूर्ण निधी केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. 

दोन वर्षांत होणार काम 
केंद्र शासनाने बलून बंधाऱ्यांना तत्काळ निधी दिल्यास दोन वर्षात सात बंधारे पूर्णत्वास येऊ शकतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. सात बंधाऱ्यांमध्ये 25.28 दलघमी एवढे पाणी साचणार आहे. तर 4 हजार 489 हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे. तर तीन पालिका व 168 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना त्याचा लाभ होऊन पाणीटंचाई कायमची दूर होण्यास मदत होणार आहे. 

'बलून'मुळे तीस टक्के खर्चाची बचत 
गिरणा वर पारंपरिक पद्धतीच्या बंधाऱ्याच्या ऐवजी बलून बंधारे होत असल्यामुळे तीस टक्के खर्चाची बचत होणार आहे. या बंधाऱ्यामुळे जवळपास 250 कोटींची बचत होणार आहे. तर पारंपरिक पद्धतीपेक्षा हा बंधारा होण्यास वेळ ही कमी लागणार आहे हे विशेष. 
 
असे असतील बलून बंधारे 
अमेरिकेत उत्पादित होणारे विशेष बुलेटप्रूफ बलुनचे गेट या बलुनसाठी वापरले जाणार आहे. सेन्सांर पद्धतीने हे बलून काम करतील. बंधाऱ्यांना हवेच्या दाबाने नियंत्रित होणारे स्वयंचलित गेट असणार आहेत. अमेरिका व चीन देशात अशा प्रकारचे बंधारे सद्य:स्थितीला असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येते. गिरणेत 25-40 फुटापर्यंत वाळू असल्याने खाली सिमेंटचे कॉक्रींट केले जाणार आहे. त्यावर हे बंधारे उभे राहतील. 
 
बंधारे............प्रकल्पाची किंमत.....साचणारे पाणी 
( कोटीत) ( दलघमी मधे) 
मेहुणबारे.........131.80.................3.96 
बहाळ.............69.89...................3.86 
पांढरद............95.56...................3.68 
भडगाव..........101.60.................2.83 
परधाडे...........91.93...................4.24 
कुरंगी.............120.28................4.24 
कानळदा.........100.6..................4.24 

Web Title: marathi news jalgaon balun bandhara iandia first