राष्ट्रीयीकृत बॅंकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शेतकऱ्यांना एकूण उद्दिष्टाच्या केवळ 8 टक्के कर्जवाटप केले. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी जूनअखेर ते शंभर टक्के शेतकऱ्यांना वाटप करावे, अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांना बजावली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 514 कोटी रुपये कर्जवाटप झाले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ 17.49 टक्के आहे. सर्वाधिक कर्ज जळगाव जिल्हा मध्यवती सहकारी बॅंकेने वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने 42 हजार 211 सभासदांना 355 कोटी 92 लाख रुपये कर्ज वाटप केले. हे प्रमाण 31.95 टक्के आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना केवळ सात हजार 350 सभासदांना 123 कोटी 53 लाख रुपये वाटप केले. हे प्रमाण 8.26 टक्के असून, अत्यल्प असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कर्जवाटपासंदर्भात कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यांना दिलेले कर्जवाटपाचे उद्दिष्ट 30 जूनअखेर पूर्ण करण्याची नोटीसच "लीड' बॅंकेच्या माध्यमातून बजावली आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कर्जवाटप करण्याचा वेग वाढविण्याची वेळ आली आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख 90 हजार 670 शेतकऱ्यांना 717 कोटी 40 लाख 60 हजार रुपये कर्जमाफी दिली आहे. 

कर्जमाफी व कर्जवाटपाबाबत राज्यस्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केल्या गेलेल्या कर्जवाटपाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना जूनअखेर कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगण्यात आले. 
- विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, जळगाव

Web Title: marathi news jalgaon bank notice callector