भरिताच्या वांग्यांमुळे दुष्काळी स्थितीवर मात 

live photo
live photo

शहापूर (ता. जामनेर) ः जामनेर तालुक्‍यात यंदा चांगला पाऊस न पडल्याने दुष्काळी स्थिती आहे. मात्र, दुष्काळी स्थितीतही येथील शेतकरी दत्तात्रय विश्‍वनाथ सनंसे यांनी दीड एकरात पाच लाख पंचवीस हजार रुपयांचे भरिताच्या वांग्यांचे उत्पन्न घेतले. त्यासाठी त्यांना नव्वद हजार रुपये खर्च आला. 
श्री. सनंसे यांनी आयटीआय वीज तांत्रिकचा कोर्स केला असून, त्यांच्याकडे वाघोळा प्रकल्प परिसरात अकरा एकर जमीन आहे. पैकी दीड एकरात त्यांनी भरिताच्या वांग्यांची लागवड केली. पाच बाय पाच याप्रमाणे तीन ते चार झाडे लावली. झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. बामणोद (ता. यावल) येथील शेतकरी भागवत फेगडे यांच्याकडून तीन हजार पाचशे रुपयांत पाच हजार रोपे आणली. श्री. फेगडे यांच्या घरी विवाह सोहळ्याची तयारी सुरू असतानाही त्यांनी मला खूप मार्गदर्शन करून उत्पादनवाढीसह विक्रीसाठी चांगल्या सूचना केल्या. जामनेर परिसरातील आठवडे बाजारात किरकोळ विक्री व भुसावळ मार्केटमध्ये ठोक विक्री सरासरी वीस रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. 

भुसावळ परिसरातून मागणी 
दुष्काळी स्थितीमुळे वांगे उत्पादनासाठी प्रसिद्ध भुसावळ परिसरातील गावात यंदा वांगे उत्पादनात घट झाल्याने आमच्या वांग्यांना या परिसरात मोठी मागणी होती. त्यामुळे ठोक विक्रीतही व्यापाऱ्यांकडून वीस ते पंचवीस रुपये किलो भाव मिळाला. 

पाळधीच्या शेतकऱ्याचे मार्गदर्शन 
वांग्यांची लागवड माझ्यासाठी नवीनच असल्याने लागवडीपासून पाळधी येथील शेतकरी गोपाळ राऊत (माळी) यांच्याकडून वेळोवेळी खताची मात्रा, फवारणीचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाचा चांगला फायदा उपयोग झाल्याचे श्री. सनंसे यांनी सांगितले. ऑक्‍टोबरपासून उत्पादनास सुरवात झाली असून, जानेवारीअखेर पाच लाख पंचवीस हजार रुपयांचे उत्पन्न आले असून, त्यासाठी नव्वद हजार रुपये खर्च आला. 

"ऍग्रोवन'मुळे मिळाली प्रेरणा 
आठ वर्षांपासून "ऍग्रोवन'चा वाचक असून, त्यातील कृषीविषयक लेख व शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचून प्रेरणा मिळाल्याचे दत्तात्रय सनंसे यांनी सांगितले. श्री. सनंसे यांच्या पत्नी प्रतिभा याही सुशिक्षित असून, मुलगा शुभम कृषी पदवीधर आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com