भुसावळला दोन लाखाची पकडली रोकड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र वाहन तपासणी मोहिम सुरू आहे. या मोहिमेत आज भुसावळ येथील हॉटेल सायलीजवळ वाहन तपासणी सुरू असताना 1 लाख 97 हजार 500 रूपये आढळून आले. 

जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र वाहन तपासणी मोहिम सुरू आहे. या मोहिमेत आज भुसावळ येथील हॉटेल सायलीजवळ वाहन तपासणी सुरू असताना 1 लाख 97 हजार 500 रूपये आढळून आले. 
लोकसभा निवडणुकी तोंडावर स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे वाहन तपासणी सुरू आहे. या वाहन तपासणीत भुसावळ येथील हॉटेल सायलीजवळ आज दुपारी वाहन (क्र. एमएच 19, बीयू 7695) या गाडीच्या मागील डिक्‍कीत 1 लाख 97 हजार 500 रूपये आढळून आले. विलास जयराम पाटील (रा. शांतीनगर, भुसावळ) यांच्या गाडीतून सदर रक्‍कम जप्त करण्यात आली आहे. सदर रक्‍कम भुसावळ कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली असल्याची माहिती नोडल अधिकारी वामन कदम यांनी दिली. 

Web Title: marathi news jalgaon bhusawal cash ricived