खानदेशच्या डॉक्‍टरांकडून जखमी पोलिसांना जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

भुसावळ : हिमाचल प्रदेशमधील लेहजवळ सहाशे मीटर खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील दोन जखमी पोलिस अधिकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या खानदेशातील डॉक्‍टरांचे कौतुक होत आहे. कुलू-मनाली येथे हा डॉक्‍टरांचा चमू फिरण्यासाठी गेला होता. तिकडून परत येताना मोरोटी तलावाजवळ टांगलाला पासजवळ ही घटना घडली. 

भुसावळ : हिमाचल प्रदेशमधील लेहजवळ सहाशे मीटर खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील दोन जखमी पोलिस अधिकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या खानदेशातील डॉक्‍टरांचे कौतुक होत आहे. कुलू-मनाली येथे हा डॉक्‍टरांचा चमू फिरण्यासाठी गेला होता. तिकडून परत येताना मोरोटी तलावाजवळ टांगलाला पासजवळ ही घटना घडली. 

भुसावळचे डॉ. वीरेंद्र झांबरे, डॉ. धीरज चौधरी व जळगावचे डॉ. नीलेश चौधरी, डॉ. दीपक पाटील, डॉ. नितीन खडसे व सी. ए. कपिल पाटील यांचा चमू 23 जूनला भुसावळला कुलू-मनाली येथे फिरण्यासाठी गेले. 24 जूनला अंबाला येथून दोन इन्होव्हा भाड्याने करुन मनालीसह परिसर फिरून दहा दिवसांनी ते परतीच्या मार्गाला लागले. 2 जुलैला लेहपासून 100 किलोमीटर दूर टांगलाला पास (खिंड) येथे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली दिसली. मारुती स्विफ्ट कार सुमारे सहाशे मीटर खोल दरीत कोसळल्याचे समजले. कोणताही विचार न करता आम्ही चार जण दरीत उतरलो. तरुणीसह 6 जण जखमी अवस्थेत होते. यापैकी दोन बेशुद्ध होते. परिसरातील मजुरांच्या मदतीने जखमींना दरीतून वर आणले. गाडीतील औषधी आणि वैद्यकीय साहित्याच्या मदतीने बेशुद्ध रुग्णांवर प्रथमोपचार करुन जवळील ऑक्‍सिजनचे सिलिंडर लावले. बेशुद्ध रुग्ण इंडो तिबेटियन बॉर्डचे पोलिस अधिकारी असल्याचे समजले. त्यांना डंपरमधून सैनिकी रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. इतर जखमींमध्ये मुंबईची तरुणी असल्याचे सांगण्यात आले. या डॉक्‍टरांच्या चमूचे सोशल मीडियावरुन कौतुक होत आहे. 
 
टांगलाला पास हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 17 हजार 830 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी प्राणवायूची कमतरता भासते हे माहीत असल्याने ऑक्‍सिजनचे सिलिंडर सोबत नेले होते. याचा योग्य उपयोग झाला. वेळीच उपचार केल्यामुळे दोन पोलिस अधिकाऱ्यांचे प्राण वाचले याचे समाधान आहे. 
-डॉ. वीरेंद्र झांबरे भुसावळ.

Web Title: marathi news jalgaon bhusawal docter police