भुसावळात भाजप नगरसेवकाच्या घरावर गोळीबार 

भुसावळात भाजप नगरसेवकाच्या घरावर गोळीबार 

जळगाव ः भुसावळ नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बांधकाम समिती सभापती रवींद्र खरात यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. सदर प्रकाराबाबत सारेच अनभिज्ञ असल्याने पोलिसात अद्याप गुन्हा दाखल होवू शकलेला नाही. 
भुसावळ शहरात गेल्या वर्षभरात दोन- तीन वेळेस गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून सत्ताधारी गटातील बांधकाम सभापती असलेले रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरासमोरून आज मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. सदर घटना रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली असल्याने गोळीबार कोणाकडून करण्यात आला, याबाबत कोणासही माहिती नाही. मात्र, आज सकाळपासून रवींद्र खरात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळा सोनवणे हे दोघे एकमेकांवर आरोप करून पोलिस स्टेशनमध्ये थांबून आहेत. मात्र गोळीबार प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com