esakal | बिल्डर'ने बांधकाम साइटवर केली आत्महत्या 

बोलून बातमी शोधा

jalgaon bildar suside

बाराच्या सुमारास त्यांचे अखरेचे बोलणे कुणाशी तरी झाले. त्यानंतर बारा ते एकदरम्यान त्यांनी बांधकाम साइटच्या ठिकाणी असलेल्या तळमजल्यातील गाळ्यात दोरीने गळफास घेतला.

बिल्डर'ने बांधकाम साइटवर केली आत्महत्या 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव ः वढोदा (ता. चोपडा) येथील मूळ रहिवासी व शहरातील अष्टभुजानगरात वास्तवास असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (वय 54) यांनी मंगळवारी दुपारी यांनी तालुका पोलिस ठाणे समोरील बांधकाम साइटच्या तळमजल्यातील गाळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ शहरात उडाली. सध्यातरी आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून, तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आर्वजून पहा : पैसे दे वरना... बेटी को उठाके धंदे पे बेठाऊंगी ! 
 

अनिल सूर्यवंशी गेल्या वीस वर्षांपासून ते पिंप्राळा परिसरातील अष्टभुजानगरात पत्नी वैशाली, मुलगा कृणाल व मुलगी कृतिका यांच्यासह वास्तव्यास होते. कृणालने दोन वर्षांपूर्वी "एमबीबीएस' ही पदवी घेतली. त्यानंतर तो जळगाव जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याताही आहे. तर मुलगी कृतिका शहरातील महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदव्युत्तर 
शिक्षण घेत आहे. सूर्यवंशी यांनी खोटेनगर, पिंप्राळा, चंदुअण्णानगर, द्वारकानगर, आहुजानगर यासह शहरात 
अनेक ठिकाणी अपार्टमेंट तसेच रो-हाऊसेस पद्धतीच्या घरांचे बांधकाम करून ते विकले. त्यातील काही अजूनही विक्रीसाठी तयार अवस्थेत आहेत. तालुका पोलिस ठाण्यासमोर "साई सृष्टी' नावाने त्यांनी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू केलेले असल्याने रोजच्या प्रमाणे आज ते त्या ठिकाणी गेले होते. 

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात 
आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांचे अखरेचे बोलणे कुणाशी तरी झाले. त्यानंतर बारा ते एकदरम्यान त्यांनी बांधकाम साइटच्या ठिकाणी असलेल्या तळमजल्यातील गाळ्यात दोरीने गळफास घेतला. या ठिकाणी शेजारी असलेल्या तरुणांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ त्यांच्या कुटुंबीयांना तसेच तालुका पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक ईश्‍वर लोखंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत त्यांचा मुलगा कृणालही घटनास्थळी दाखल झाला. रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. कुठल्याही ताणतणावात नसताना सूर्यवंशींनी आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा? हा प्रश्‍न अनुत्तरीत असून, पोलिस तपास करीत आहेत. 
 

क्‍लिक कराः  सरकारी कर्मचाऱ्यांना उरले 205 दिवस काम