भाजप-सेना सत्तेसाठी एकत्र येतील दोन्ही थापाड्यांना जनतेने दूर ठेवावे : जितेंद्र आव्हाड

live photo
live photo

जळगाव :राज्यातील भाजप-सेना शासन थापाडे आहे. दिलेल्या एकही आश्वासनाची पूर्तता या लोकांनी आतापर्यंत केलेली नाही.आपले पितळ उघडे पडू नये म्हणून जळगाव महापालिकेची निवडणूक ते एकमेकांविरोधात लढत आहेत. सत्ता असतांना काही केले नाही . आता दोन्ही पक्ष जनतेला अश्वासनांची गाजरे दाखवत आहेत. जनतेची दिशाभूल करून पुढे हिच मंडळी संत्ते साठी एकत्र येतील. अशा थापाड्यांना आता सत्तेपासून दूर ठेवा. असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते . जितेंद्र आव्हाड यांनी आज केले.
प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीचे उमेदवार मोरे प्रियंका रविंद्र खान नजीर मोहम्मद खान यांच्या प्रचारार्थ गेदालाल मिल भागात आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आपण या पूर्वी दोन्ही पक्षांना सत्ता दिलेली आहे. सत्तेत राहून देखिल या दोन्ही पक्षांला शहराच्या विकास साधता आला नाही. मात्र या लोकांच्या स्वतःच्या विकास चांगला झालेला दिसतो .आता हिच
लोकं विविध अश्वासने देवून सत्ता मिळविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. आता अश्‍या थापाड्यांना सत्ता देता विकासासाठी "राष्ट्रवादी'ला संधी दया, पुढे येणारे राज्यातील शासन राष्ट्रवादी आघाडीचे असेल. त्या माध्यमातून शहराच्या सर्व समस्यांच्या बाबतीत निश्‍चितच विकास केला जाईल . असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक नगरसेवक राजू मोरे, राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्षा सौ. निला चौधरी , जि . . सदस्य रविंद्र पाटील , युवकचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश देसले यांच्यासह दोन्ही उमेदवार उपस्थितीत होते .

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com