महापौर भाजपचा तरच युती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

जळगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून जळगाव शहराचा विकास ठप्प झाला आहे. विकासासाठी निधी देण्याची आपली तयारी आहे. निवडणुकीत युती करण्यास हरकत नाही. जागा वाटपात स्थानिक स्तरावरच बोलणी करा. मात्र, यात भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, जर जागा वाटपाचा योग्य निर्णय झाला नाही तर युती होणार नाही, असा स्पष्ट निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

भाजप, शिवसेना, खानदेश विकास आघाडीच्या युतीसाठी आज गिरीश महाजन, सुरेशदादा जैन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आमदार चंदुलाल पटेल व माजी महापौर नितीन लढ्ढा होते. त्यांच्यात वीस मिनिटे चर्चा झाली. 

युतीसाठी योग्य जागावाटप हवे 
याबाबत गिरीश महाजन यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांशी युतीबाबत चर्चा झाली. त्यांनी सकात्मकताही दाखविली. जळगावच्या विकासासाठी महापौर भाजपचाच होईल. महापालिकेचे कर्ज तसेच इतर बाबींबर चर्चा करण्यात आली आहे. जागावाटप स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी करावे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, यात भाजपच्या इच्छुकांना संधी मिळण्याबाबतही त्यांनी स्पष्ट केले. जागावाटप योग्य झाले नाही तर युती होणार नाही, असेही सांगण्यात आले. 

भाजपशिवाय पर्याय नाही 
गेल्या काही वर्षांत जळगावचा विकास थांबला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा जळगावला मिळाल्या नाहीत. त्यामुळे भाजपशिवाय जळगावला पर्याय नाही. सुरेशदादांनीही विकासासाठी आपण महापौरपद देण्यास तयार आहोत, असे एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे भाजपला महापौरपदाची संधी दिल्यास जळगावचा निश्‍चित विकास होईल. जळगावच्या विकासाचे चित्रही बदलणार असल्याचे महाजन म्हणाले. 
 
जागावाटपाची लवकरच बैठक 
भाजप-शिवसेना व खाविआ यांच्यात जागा वाटपासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. भाजपकडे आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येईल. त्यानंतर जागा वाटपाची चर्चा महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे तसेच स्थानिक पदाधिकारी व शिवसेना, खाविआच्या पदाधिकाऱ्यांसोबत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: marathi news jalgaon bjp yuti mahapalika