"कॅम्पस'मुळे "मॅनेजमेंट'च्या विद्यार्थ्यांना अच्छे दिन! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जळगाव : विद्यार्थ्यांना शिकता-शिकता नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सध्या महाविद्यालयांमध्ये "कॅम्पस इंटरव्ह्यू'चे आयोजन केले जाते. या उपक्रमाद्वारे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरातील पन्नासहून अधिक नामवंत कंपन्या शहरात येतात. या कंपन्या वेगवेगळ्या पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड करतात. अलीकडच्या काळात "मॅनेजमेंट'मध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना "अच्छे दिन' आले आहेत. 

विविध कंपन्यांकडून "कॅम्पस इंटरव्ह्यू'द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक मानधन देण्यात येते. यात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या कंपनी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असतात. शहरातील मॅनेजमेंट, अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी या मुलाखती घेण्यात येतात. यात शहरात पन्नासहून अधिक कंपन्या येत असतात, तर दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. 
 
मॅनेजमेंटला अधिक संधी 
शहरात मॅनेजमेंट व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी "कॅम्पस इंटरव्ह्यू' घेण्यात येतात. मात्र यात सर्वाधिक संधी य मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मिळतात. अभियांत्रिकी क्षेत्राची सध्याची स्थिती बिकट असून यात विद्यार्थी अधिक व नोकऱ्या कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे एमबीए मार्केटिंग व फायनान्स सोबतच हॉटेल मॅनेजमेंट विषयाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होत आहे. यात मॅनेजमेंटच्या दरवर्षी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड होते. 

मुलाखतीसाठी प्रशिक्षण 
महाविद्यालयात एकावेळी एकापेक्षा अधिक कंपन्या सोबत येत असतात. एक किंवा दोन दिवस चालणाऱ्या या मुलाखतीत विद्यार्थ्यांनी स्वत:ला कसे प्रेझेंट करावे यासोबतच ड्रेस व आपले बोलणे कसे असावे, यासाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना आठवडाभर प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे विद्यार्थी कंपनी मालकांसमोर आपले प्रेझेंटेशन उत्कृष्टपणे करू शकता. 
 
प्रत्येक कंपनीत मॅनेजमेंट ही आवश्‍यक असल्याने इतर कोर्सेसपेक्षा मॅनेजमेंट नोकऱ्या या अधिक आहे. मोठ्या शहरातील कंपन्यांची जिल्ह्यातील महाविद्यालयांना पसंती असल्याने दरवर्षी अनेक मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. 
- डॉ. प्रीती अग्रवाल (संचालिका, रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) 

Web Title: marathi news jalgaon campus interviwe student