चक्‍क उमेदवार बैलगाडीतून आले मतदानाला 

live photo
live photo

जळगाव :  शिवसेनेचे उपनेते सहकाराज्यमंत्री व जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार गुलाबराव पाटील बैलगाडीत बसून मतदानाला आले. 
मतदार संघातील पाळधी येथे शिवसेना कार्यालयापासून ते बैलगाडीने मतदानाला गेले. जिल्हा परिषद मराठी शाळा पाळधी बुद्रूक येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. मतदान केल्यावर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, आपल्या मतदार संघात भाजपकडून बंडखोरी केलेला उमेदवार उभा आहे, गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपचा बंडखोर उमेदवार उभा आहे. त्याबाबत बोलतांना ते म्हणाले, निकालात जनताच त्याला त्यांच्या बंडखोरीची जागा दाखवून देईल. यापुढे तो आयुष्यात बंडखोरी करणार नाही, कानाला खडा लावून घेईन.बंडखोरानी भाजप नेत्यांचे फोटो लावल्याबद्दल ते म्हणाले, या बंडखोरांना स्वत:चे नाव, गाव माहित नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्याचे फोटो लावले आहेत. मतदार संघात आपल्याला भाजपचे वीस टक्के सहकार्य मिळाले 80 टक्के सहकार्य आपल्याला मिळाले नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com