कोरोना युद्धात "खाकी'ला माणुसकीचा घास 

hirkani
hirkani

जळगाव : प्रत्येक मोठ्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरून जेवणाचा डबा सोबत घेऊन "लॉकडाउन'चा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. अशातच बाहेरगावाहून चाळीसगाव तालुक्‍यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांसाठी येथील हिरकणी महिला मंडळाच्या वतीने दररोज जेवणाचे डबे उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाउनच्या काळात माणूस "लॉक' असला तरी माणुसकीचे द्वार सदैव खुले असल्याचे या उपक्रमातून सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील अनेक पोलिसांना घराबाहेर पडताना पोटाची व्यवस्था करण्यासाठी डबा घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे. पोलिसांचे एकत्र जेवण तयार करणारा आचारी किंवा त्याचे सहकारी "कोरोना'बाधित रुग्णाच्या संपर्कात आले तर कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन बंदोबस्तात पोलिस प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भोजनाची एकत्र व्यवस्था केली नाही. 

सामाजिक जाणिवेतून उपक्रम 
लॉकडाउनदरम्यान हॉटेल, उपहारगृहदेखील बंद आहेत. परिणामी, बाहेर जेवणाची व्यवस्था नसल्याने चाळीसगाव येथील स्व. महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळाने सामाजिक जाणिवेतून बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरगुती जेवण उपलब्ध करून दिले आहे. मंडळाच्या या कार्यासाठी जयराज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनुप परमार यांचे सहकार्य लाभत असून, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक निरीक्षक मयूर भामरे यांच्याकडून मंडळाच्या या विधायक कार्याची प्रशंसा करण्यात आली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com