जिल्ह्यातील चिनावलचा पारा 49 अंशावर 

जिल्ह्यातील चिनावलचा पारा 49 अंशावर 

जळगाव ः उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. मे हिटचा तडाखा बसण्यापुर्वीच सुर्याने आग ओकण्यास सुरवात केली असून, जळगाव जिल्ह्यातील चिनावल (ता. रावेर) येथे आज 49 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. यामुळे सुपर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे असून, जिल्ह्यात अघोषित संचारबंदी लागली आहे. 
गेल्या आठवडाभरापासून सुर्याने आग ओकण्यास सुरवात केली आहे. यामुळे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सात- आठ वर्षात इतक्‍या उच्चांकी तापमानाची नोंद झाली नाही; ती यावर्षी झाली आहे. साधारण चार- पाच दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वसाधारण तापमान हे 45 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. यात आज जळगाव शहरातील तापमानाचा पारा 46 अंशावर पोहचला असून, जिल्ह्यातील रावेर तालुका परिसरात 49 अंश सेल्अिस इतक्‍या तापमानाची नोंद दुपारी झाली. तसेच भुसावळ 47, चोपडा 47 अंश सेल्सिअसवर पारा पोहचला आहे. यामुळे शेतात असलेल्या केळीवर याचा परिणाम होत असून केळीचे घड आपोआप खाली गडून पडत आहेत. 

जनजीवन विस्कळीत 
वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या उन्हात कोणीही बाहेर निघाले नाही. यामुळे शहर व परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. यात आज रविवार असल्याने सर्वत्र अघोषित संचारबंदी लागल्याचा अनुभव येत होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com