आदिवासींच्या शैक्षणिक गुणवत्तेचा बोजवारा 

सुनील पाटील
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

चोपडा : चोपडा तालुक्‍यातील सातपुडा पर्वत रांगांमधील काही अनुदानित आश्रमशाळांमध्ये नुसता अनागोंदी कारभार सुरू आहे. याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, गुणवत्तेचा पुर्णतः बोजवारा उडाला असल्याचा प्रकार जिल्हा नियोजन समिती सदस्या प्रा. डॉ नीलम पाटील यांच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यान दिसून आला आहे. 

तालुक्‍यात खाजगीसह शासकीय 14 आश्रमशाळा आहेत. काही खासगी आश्रमशाळांमध्ये तर आदिवासीच आदिवासींचा मलिदा लाटत आहेत. या गंभीर प्रकाराकडे कुणी लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. अवघ्या 30 ते 35 किमी अंतरावर आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे. अनेकवेळा आदिवासी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यातच 
देवझीरी व वैजापूर येथील आश्रमशाळेत भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा अभाव, तर दिसून आला. एव्हढेच नाही तर कर्मचारी हजेरी बुकवर (मस्टर वर) मुख्याध्यापकसह काही शिक्षक सतत गैरहजर असल्याचे दिसून आले, शाळेतील वातावरण अस्वच्छ, घाणेरडे आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्याची, झोपण्याची व्यवस्था स्वच्छतागृह अतिशय अस्वच्छ दिसून आले. 

फुलींची सुरक्षितता वाऱ्यावर 
आदिवासींच्या जीवाशी खेळ सुरू असून मुलींची सुरक्षितता ही वाऱ्यावर आहे.आदिवासीचा विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची पाडत आहे. मात्र, यातून किती मुलांचे भवितव्य उज्वल होते 
हा निधी कुणाच्या घशात जात आहे. लाखो रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडूनही आदिवासी बांधव आजही तसाच आहे. विकासाच्या गप्पा मारणारे शासनाचे अधिकारी ही याप्रकाराकडे सोईस्कर डोळेझाक करीत आहे. अजूनही शासनाच्या योजना आदिवासी च्या उंबरठ्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत त्यातल्या त्यात तालुक्‍यात सर्वांत जास्त वाईट अवस्था आदिवासी विद्यार्थ्यांची आहे 

Web Title: marathi news jalgaon chopda aadivasi school