चोपड्याच्या या पतसंस्थेचे चेअरमन व संचालकांना अपात्रतेची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

तक्रारदाराने सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे चेअरमन व संचालकांच्या अपात्रतेसंबंधी तक्रार अर्ज केला होता. सदरील तक्रार अर्जावर सहायक निबंधकांनी 27 फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली असून पतसंस्थेचे व्यवस्थापक यांना संचालक मंडळाची येणे कर्ज व थकबाकी यादीसह संपूर्ण रेकॉर्ड घेवून हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. 

जळगाव ः जळगावातील बीएचआर को- ऑपरेटीव्ह सोसायटीकडून कोट्यावधी रूपयांचे कर्ज घेवून त्याची फेड अद्याप केलेली नाही. या प्रकरणी आलेल्या तक्रारीवरून चोपडा येथील महावीर नागरी सह. पतपेढीचे चेअरमन व संचालक यांना सहा. निबंधक के. पी. पाटील यांनी अपात्रतेसाठी शो कॉज नोटीस बजावली आहे. 

हेपण वाचा - जिल्ह्यात एक हजार पन्नास कोटींची कर्जमुक्‍ती 

भाईचंद हिराचंद को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी जळगाव येथून व महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित चोपडा या संस्थामधून महावीर नागरी पतपेढीच्या चेअरमन रेखा शांतिलाल बोथरा व संस्थापक चेअरमन (विद्यमान संचालक) प्रा. शांतिलाल बोथरा यांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले असून सदर कर्ज थकित झाले आहे. याबाबतचा अहवाल संबंधित संस्थाने दिला आहे. यासंबंधी एका तक्रारदाराने सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे चेअरमन व संचालकांच्या अपात्रतेसंबंधी तक्रार अर्ज केला होता. सदरील तक्रार अर्जावर सहायक निबंधकांनी 27 फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली असून महावीर पतसंस्थेचे व्यवस्थापक यांना संचालक मंडळाची येणे कर्ज व थकबाकी यादीसह संपूर्ण रेकॉर्ड घेवून हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. 

27 च्या सुनावणीकडे लक्ष 
पतसंस्थाचे कोट्यावधीचे कर्ज थकीत असल्याने ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा कोणाकडे मागावा असा प्रश्न ठेवीदारांमध्ये चर्चिला जात आहे. ठेवीदारांचे ठेवी देखील असुरक्षित झाली की काय? अशी चर्चा शहरात आहे. अपात्रतेच्या शो कॉज नोटीसमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून 27 फेब्रुवारीला होणाऱ्या चौकशीकडे चोपडा वासियांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून संस्थेची 89 (अ) प्रमाणे चौकशी देखील सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon chopda mahavir patsantha chearman notice

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: