जिल्ह्यात एक हजार पन्नास कोटींची कर्जमुक्ती 

जिल्ह्यात एक हजार पन्नास कोटींची कर्जमुक्ती 

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्याची शनिवार (ता. 15) अंतिम मुदत आहे. जिल्ह्यात जिल्हा बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एकूण 1 लाख 74 हजार 741 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यात राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून केवळ 29 हजार 429 शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. एकूण एक हजार 50 कोटी 12 लाख अकरा हजार रुपयांची कर्जमुक्ती होणार आहे. 

राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले कर्जमुक्तीची घोषणा केली. या अंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. त्या दृष्टीने लाभार्थीच्या याद्या तयार करून त्यांच्या खात्यावर ती रक्कम टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अंतिम याद्या करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅंकेने कामही पूर्ण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 

पावणेदोन लाख लाभार्थी 
जळगाव जिल्ह्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचे महात्मा फुले कृषी योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा बॅंकाचे एकूण 1 लाख 77 हजार 744 लाभार्थी आहेत. यात जिल्हा बॅंकेचे 1 लाख 49 हजार 741 लाभार्थी आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांची संख्या कमी असून, केवळ 24 हजार 429 शेतकऱ्यांनाच या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. 

एक हजार पन्नास कोटीची कर्जमुक्ती 
जिल्ह्यात साधारण पावणेदोन लाख शेतकऱ्यांना एक हजार पन्नास कोटी 12 लाख अकरा हजार रुपयांची कर्जमुक्ती होणार आहे. यात यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून साधारणत: 149 कोटीची तर जिल्हा सहकारी बॅंकेकडून 745 कोटी 42 लाख 99 हजाराची कर्जमुक्ती होणार आहे. 

जिल्ह्यातील बॅंकांमधील लाभार्थी व रक्कम 
चौकट शाखा लाभार्थी रक्कम(आकडे लाखात) 
जळगाव जिल्हा बॅंक 230 149741 795,42.99 
आयसीआयसीआय 14 555 6,66.09 
सेंट्रल बॅंक 39 5139 43,69.32 
बॅंक ऑफ महाराष्ट्र 20 4378 50,45.60 
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक 12 666 6,69.76 
इंडियन ओव्हरसीस बॅंक 0 0000 000000 
एचडीएफसी बॅंक 00 364 2,51.99 
कॉर्पोरेशन बॅंक 01 83 1,15.02 
स्टेट बॅंक ऑफ इंडिया 55 4956 58,96.00 
आयडीबीआय बॅंक 21 1972 16,29.92 
पंजाब नॅशनल बॅंक 00 0000 000000 
बॅंक ऑफ इंडिया 00 0000 000000 
बॅंक ऑफ बडौदा 34 5137 53,83.00 
इंडियन बॅंक 00 0000 0000000 
कॅनरा बॅंक 04 126 1,23.09 
ओरिएंटल कॉमर्स बॅंक 00 0000 00000000 
युनियन बॅंक ऑफ इंडिया 19 1583 0000000 
ऍक्‍सिस बॅंक 04 30 0.94 
आरबीआय बॅंक 00 00000 000000 
येस बॅंक 06 00 00000 
युको बॅंक 04 57 56.68 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com