चित्रा चौकात अपघात; दुचाकीस्वार ठार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

जळगाव ः शहरातील मध्यवर्ती आणि वरदळीचा परिसर असलेल्या चित्रा चौकात अपघात होवून यात एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर अपघात आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. 

जळगाव ः शहरातील मध्यवर्ती आणि वरदळीचा परिसर असलेल्या चित्रा चौकात अपघात होवून यात एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर अपघात आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. 
शहरातील रहदारीचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. प्रमुख चौकांमध्ये देखील सिग्नल यंत्रणा असताना हा प्रश्‍न भेडसावत आहे. शनिवार असल्याने मुख्य बाजारपेठे अधिक वरदळ असते. अशातच मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या वरदळीच्या चित्रा चौकात आज (ता.13) सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीला (एमएच, 19, डीबी 4048) आयशरच्या (क्र ः एमएच 04, डीडी 6453) अपघात झाला. यात शहरातील पोस्टल कॉलनीमधील रहिवासी दुचाकीस्वार अनिल श्रीधर बोरोले (वय 68) यांचा जागीच मृत्यू झाला. आयशरने धडक दिल्याने ते खाली पडले असता मागचे चाक त्यांच्या डोक्‍यावरून गेले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आयशर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city chitra chok accident one deaith