शहरातील रस्ते "एलईडी' दिव्यांनी झळकणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

जळगाव ः महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते हे "एलईडी'ने झळकणार आहे. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीशी मनपाचा सात वर्षाचा करार झाला आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू असून "एलईडी' पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करून कार्यालय सुरू करण्याचे पत्र कंपनीच्या व्यवस्थापकांना महापौर सीमा भोळे यांनी दिले आहे. 

जळगाव ः महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते हे "एलईडी'ने झळकणार आहे. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीशी मनपाचा सात वर्षाचा करार झाला आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू असून "एलईडी' पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करून कार्यालय सुरू करण्याचे पत्र कंपनीच्या व्यवस्थापकांना महापौर सीमा भोळे यांनी दिले आहे. 

जळगाव महानगरपालिका हद्दीत मुंबई येथील एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून " एलईडी ' पथदिवे बसविण्याच्या ठराव 11 ऑक्‍टोंबर 2018 महासभेत करण्यात आला होता. तसेच कार्यादेश देखील काढण्यात आले आहेत. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी व महापालिकेत सात वर्षासाठी हा करार झाला आहे. यानुसार कंपनीकडून

शहरातील रस्ते, पथदिव्यांची पाहणी 
करण्याचे काम सुरू केले आहे. सर्व्हेचे काम तत्काळ पूर्ण करून शहरात "एलईडी' पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करावे, जेणे करून विजेची बचत होईल. सद्यःस्थितीत खांबावर असलेले पथदिवे दुरुस्तीसाठी महानगरपालिकेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही, असे पत्रकात नमूद केले आहे. 

स्वतंत्र कार्यालय होणार 
शहरातील "एलईडी' पथदिवे बसविण्याचे व सात वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी कंपनी हे काम करणार आहे. त्यामुळे या कंपनीचे अद्याप स्वतंत्र कार्यालय सुरू झालेले नाही. कार्यालय तत्काळ सुरू करून स्वतंत्र प्रतिनिधी यासाठी नियुक्त करावा असे पत्रातून महापौरांनी कंपनीच्या व्यवस्थापकाला सुचविले आहे. 

50 टक्के खर्च होणार कमी 
महानगरपालिकेच्या हद्दीत सद्याच्या स्थितीत 17 हजार पथदिवे आहेत. महिन्याला 25 लाख रुपये खर्च मनपाला महिन्याला लागतो. पथदिव्यांवर एलईडी लाइट बसविल्यानंतर यातून 50 टक्के खर्च कमी होणार आहे. त्यामुळे बचत झालेला 25 टक्केचा खर्च हा सात वर्षापर्यंत एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड,कंपनीला देण्याचा करारानुसार देखभाल दुरुस्तीला दिला जाणार आहे. 

सर्वेक्षण सुरू 
सध्या कंपनीकडून शहरात सर्वे करण्यात येत असून पथदिव्यांच्या खाबांची उंची, दोन खांब मधील अंतर, रस्त्याची लांबी, रुंदीची नोंद करण्यात येत असून त्याप्रमाणे पोलच्या उंची, अंतर व क्षमतेनुसार एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon city road led lamp