धक्कादायक...! पती समोरच झाला पत्नीवर अतिप्रसंग  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tortotred pidit imege

सिटीस्कॅन रुमकडे घेऊन जात असताना वॉर्डबॉय विष्णूने महिलेसोबत कोणी नसल्याची खात्री केली. खुर्चीवर बसलेल्या जायबंदी पतीला सोडत महिलेचा हात पकडून तिला बाजूला ओढून बोळीत नेण्याचा प्रयत्न केला.

धक्कादायक...! पती समोरच झाला पत्नीवर अतिप्रसंग 

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात जायबंदी (पॅरालाईज्‌) रुग्णाच्या चाळीस वर्षीय पत्नीवर वॉर्डबॉयने अतिप्रसंग करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस 
ठाण्यात आज याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील सुरक्षेचे "तीनतेरा' वाजल्याचे हे गंभीर चित्र या घटनेतून पुढे आले आहे. 

मूळ अमळनेर तालुक्‍यातील रहिवासी चाळीस वर्षीय विवाहितेने याबाबत तक्रार दिली त्यात पतीला 5 फेब्रुवारीस पॅरालिसीसचा झटका आला होता. मुंबईच्या के.ई.एम रुग्णालयात उपचार करुन नुकतेच ते जळगावी परतले. मंगळवारी (ता.18) प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्‍टरांनी तपासणी नंतर सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला होता. वॉर्डात दाखल केल्यानंतर पॅरालिसीस झालेल्या जायबंदी पती सोबत चाळीस वर्षीय विवाहिता व तिचा पुतण्या दोघेही थांबलेले होते. 

क्‍लिक कराः  तो नरभक्षक पून्हा आला...अन्‌ पसरली दहशत 
 

असा घडला प्रकार 
मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास रुग्णासाठी ज्यूस घेण्यासाठी पुतण्या बाहेर गेला असता, वॉर्डबॉय विष्णू सुरवाडे वॉर्डात आला व त्याने पतीच्या सिटीस्कॅन करण्यास सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या एका मुलाच्या मदतीने बेशुद्धावस्थेतील रुग्ण पतीला व्हिलचेअरवर बसून सिटीस्कॅन रुमकडे घेऊन जात असताना वॉर्डबॉय विष्णूने महिलेसोबत कोणी नसल्याची खात्री केली. खुर्चीवर बसलेल्या जायबंदी पतीला सोडत महिलेचा हात पकडून तिला बाजूला ओढून बोळीत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने आरडाओरड केल्यानंतर, त्याच्या तावडीतून सुटून पतीला घेऊन विवाहिता वॉर्डात परतली. घडला प्रकार सोबत असलेल्या पुतण्याला सांगितल्यानंतर दोघांनी आज सकाळी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिली. 

आर्वजून पहा : पैसे दे वरना... बेटी को उठाके धंदे पे बेठाऊंगी !
 

loading image
go to top