राज्यातील विरोधकांची अवस्था बुध्दू मुलासारखी : मुख्यमंत्री फडणवीस 

live photo
live photo

जळगाव: अभ्यास करायचा नाही,आणि नापास झाल्यानंतर फेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा अशा बुध्दू मूलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झालेली आहे. सत्तेत असतांना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून त्यांना मतदान देत नाही.त्यामुळे त्यांचा पराभव होतो, परंतु ते दोष मात्र "ईव्हीएम' ला देत असतात असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. जळगाव येथे महाजनादेश यात्रेत ते बोलत होते. 
नंदूरबार येथून सुरू झालेली दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा आज जळगावात पोहोचली. धुळे येथून अमळनेर, धरणगाव मार्गे जळगावात दाखल झाली. रस्त्यात यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. जळगाव येथे सागर पार्क येथे जाहिर सभा घेण्यात आली. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ,चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार सुरेश भोळे यांनी केले. 
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेचा आर्शिवाद घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. राज्यात आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती वाईट झालेली आहे. जनता त्यांना मते देण्यास तयार नाही, परंतु ते ईव्हीएम ला शिव्या देत आहेत. सत्तेत असतांना त्यांनी जनतेची कामे केली नाही, आता विरोधात असतांनाही ते केवळ आपल्या संस्था सांभाळत आहेत. त्यामुळे जनतेला आता सर्व समजले असून जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. ईव्हीएम मतदान देत नाही, व्यक्ती मतदान देतो त्यामुळे ईव्हीएम शिव्या देवून काहीही होणार नाही. त्यांनी जनतेत गेले पाहिजे. 

मेगा गळतीचा विचार करावा 
कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये नेते येत आहेत. त्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधक आमच्या मेगा भरतीबाबत विचारत आहेत. मात्र त्यानीं आमच्या भरतीचा विचार करण्यापेक्षा त्यांच्यात होणाऱ्या गळतीचा विचार केला पाहिजे. आज या पक्षात राहण्यास कोणीही तयार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com